Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीने दिली मोठी अपडेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात खळबळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता त्यावर अजित दादांच्या जवळच्या व्यक्तीने वक्तव्य केले आहे.

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीने दिली मोठी अपडेट
ajit-pawar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 30, 2026 | 1:51 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पवार कुटुंबिय एकत्र येऊन दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या एका जवळच्या व्यक्तीने यावर वक्तव्य केले आहे.

डिझाइन बॉक्स कंपनीचे मालक आणि जित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामतीमध्ये पोहोचले आहेत. भेटीपूर्वी त्यांनी अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर देखील वक्तव्य केले आहे. ते नेमंक काय म्हणाले वाचा…

नरेश अरोरा म्हणाले की, आमच्या आठवणी खूप आहेत. आम्ही केवळ लोकसभेत काम केलेले नाही. आम्ही विधानसभेच्या आधी पासून एकत्र काम करत होतो. आठवणींचा खूप मोठा पिटारा आहे. आता बोलण्यासारखं काहीच नाही. कारण जे काही अचानक घडले आहे, अकाली निधन झाले आहे झाले आहे यावर काय बोलू शकतो. त्यांचा वारसापुढे जायला हवा. पार्टी आणि वारसा पुढे कसा घेऊन जाता येईल हे त्यांच्या कुटुंबियांनी पाहायला हवे.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे?

पुढे ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याची कार्यकरत्यांची मागणी स्वाभाविक आहे. अशा परिस्थित अशी मागणी होते. बाकी याचा निर्णय तर पार्टीने घ्यायला हवा, कुटुंबाने घ्यायला हवा. माझे त्यांच्यासोबत जे नाते होते ते कौटुंबिक जास्त होते आणि व्यावसायिक कमी होते. येत्या काळात पाहूया काय होते. काल माझे मुंबईत काही काम होते. आज मी पुन्हा बारामतीमध्ये आलो आहे. परिवारासोबत उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे. आणि जे काही बोलणे आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. या सगळ्या गोष्टी पक्षाच्या आहेत. आता निर्णय घेणे घाई होईल. अस्थी वित्सर्जन सुरु आहे. अशा प्रकारचे बोलणे आता होऊ नये. योग्य वेळ येणार.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर?

नरेश अरोरा यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, ‘बोलणे सुरु होते. हे सर्व काही पक्षाच्या अंतर्गत बोलणे झाले होते. मी हे सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही. ज्या गोष्टी जेव्हा सर्वांसमोर यायला हव्यात तेव्हा त्या योग्य वेळेत येतील असे उत्तर दिले आहे.