Video – Maha Infra Conclave टाटांच्या पुढाकाराने 1.75 हजार लोकांना रोजगार देणारं संकूल नवी मुंबईत उभं राहणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

नवी मुंबईत आयटी पार्क उभारण्यात येत आहे. टाटा आणि अॅक्टिस कंपनीनं यासाठी सहकार्य करार केलाय. यामधून एक लाख 75 हजार रोजगार निर्मिती होईल, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी सांगितलं. टीव्ही 9 मराठीच्या महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये देसाई बोलत होते.

Video - Maha Infra Conclave टाटांच्या पुढाकाराने 1.75 हजार लोकांना रोजगार देणारं संकूल नवी मुंबईत उभं राहणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
टीव्ही 9 मराठीच्या महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई.
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 2:14 PM

मुंबई : 2025 मध्ये महाराष्ट्र हा संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही बरेच प्रयत्न केलेत. त्याची फळ येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई आज बोलत होते. कोरोना काळात काही काळ वाया गेला. पण, सरकार हातावर हात ठेऊन स्वस्थ बसले नाही. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही (Maharashtra will not stop ) . या कठीण काळातही आम्ही देशातील तसेच विदेशातील गुंतवणूक आणली. यासंदर्भात करार केले. दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात (Investment in Maharashtra) नव्याने येत आहे. हे सगळे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होताहेत. हे सर्व काही फक्त कागदावरचे सामंजस्य करार नाहीत. प्रकल्प येणार, ते सुरू होणार, याची खात्री करूनचं या करारांवर सह्या केलेल्या आहेत. त्यामुळं यातून आपले अर्थकारण मजबूत (Economy Strong) होईल. राज्याचा महसूल वाढेल. तीन लाख युवकांना यातून रोजगार मिळेल, असंही देसाई म्हणाले.

गुंतवणूकदारांना पुरविल्या सुविधा

सुभाष देसाई पुढं म्हणाले, बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ किती लांब आहे, हे सार गुंतवणूकदार बघत असतात. रस्त्यांचं जाळ, रेल्वेची सुविधा, या सुविधा असल्यामुळं गुंतवणूकदाराचं मनोधैर्य यामुळं वाढतं. पायाभूत सुविधांचे प्रकल्पांचे वेगाने सुरू आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. उद्योगांची काही क्षेत्र आधुनिक पद्धतीनं कसे विकसित होतील, हे पाहिलं. औरंगाबाद आणि तळेगावला इलेक्ट्रानिक्सचा औद्योगिक पार्क तयार करत आहोत. कारण केंद्र सरकारला इलेक्ट्रानिक्सच्या क्षेत्रामध्ये जास्तीत-जास्त उद्योजकांचं जाळ विकसित करायचं आहे. पेट्रोल, डिझेलनंतर आपण इलेक्ट्रानिक्सच्या वस्तू आयात करत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रानिक्सच्या वस्तू निर्माण करायच्या आहेत. काही रसायन चीनमधून आयात करावी लागतात. ते अवलंबित्व कमी करावं आणि आपल्याकडं या वस्तू तयार व्हाव्यात. यासाठी हे पार्क तयार करण्यात येतंय.

औद्योगिकदृष्ट्या फार मोठी झेप

नवी मु्ंबईत देशाचं जेम ज्वेलरी एक्सपोर्ट काउंसिल आहे. याठिकाणी एका कंपनीला एक अॅक्टिस या समूहाला दिला. मोठा भूखंड दिला. त्यांना सर्व सुविधा दिलेल्या आहेत. त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. त्यामध्ये साधारणपणे दीड लाख कर्मचाऱ्यांना तिथं काम मिळेल. इतकं हे जागतिक दर्जाचं जेम ज्वेलरीचं हे पार्क याठिकाणी विकसित होतंय. याच उद्योगसमूहात टाटा उद्योग समूहानं अॅक्टिस या कंपनीसोबत संयुक्त प्रकल्प योजलेला आहे. नवी मुंबईत इंडस्ट्रीयल मिनरल आणि केमिकलची कंपनी बऱ्याच वर्षांपासून बंद पडली होती. त्यामध्ये मध्यस्ती करून भूखंड काढून घेतला. हा भूखंड आता टाटा समूह आणि अॅक्टिस या कंपनीला दिलाय. त्यामधून मोठा माहिती तंत्रज्ञानावर आधारित आयटी पार्क, डेटा सेंटर, कमर्सीअल काम्प्लेक्स उभारण्यात येतोय. यामधून एक लाख 75 हजार रोजगाराची क्षमता आहे. त्यामुळं औद्योगिकदृष्ट्या फार मोठी झेप रोजगार निर्मितीच्या दृष्टीने होत आहे, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.

VIDEO | नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?

Sunil gavaskar: गावस्करांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली, तर विराट कोहलीचं काय होणार?

किंगखानचा मुलगा आर्यन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार, पण अभिनय करणार नाही; मग काय करणार?

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.