AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टरांचा भोंगळ कारभार; सरकारी रुग्णालयात सुरु तरी काय? प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलाचा मृत्यू, दुसरी तर… मनसे ॲक्शन मोडवर

डॉक्टरांचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारी रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, बाळाचाही पोटातच मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण आहे... घटडलेल्या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते ॲक्शन मोडवर आले आहेत.

डॉक्टरांचा भोंगळ कारभार; सरकारी रुग्णालयात सुरु तरी काय? प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलाचा मृत्यू, दुसरी तर... मनसे ॲक्शन मोडवर
| Updated on: Jul 02, 2026 | 12:51 PM
Share

नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला व्हेंटिलेटरवर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे आता  डॉक्टरांचा भोंगळ कारभार  पुन्हा समोर आला आहे. ज्या डॉक्टरांच्या हातात रुग्णांचं संपूर्ण आयुष्य असतं, त्यांच्यावर आता निशाणा साधला जात आहे. गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबिय देखील संतपले असून खळबळ उडाली आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे, तिच्या बाळाचा  देखील पोटातच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ऐरोलीतील रुग्णालयात प्रसूतीसाठी दोन महिला दाखल झाल्या होत्या. पण दोन महिलांपैकी एकीचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे तिचं नाव सोनम डोंगरे असं होतं, तर तिच्या बाळाचा देखील पोटातच मृत्यू झाला आहे. उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घडलेल्या घटनेनंतर मनसे पक्षातील कार्यकर्ते ॲक्शन मोडवर आले असून, राजमाता जिजाऊ रुग्णालय येथे जाब विचारण्यासाठी आले आहेत. ऐरोली राजमाता जिजाऊ रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ माधवी इंगळे यांना जाब देखील विचारला. घडलेल्या घटनेनंतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची देखील माहणी होत आहे. यावर महापैर सुजाता पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

घडलेल्या घटनेनंतर महापौर सुजाता पाटील यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर, घटनेच्या चौकशीसाठी तात्काल समिती नेमण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. शिवाय येत्या 15 दिवसांत समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे… असं देखील महापौर म्हणाल्या.

घडलेल्या घटनेवर वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात, गर्भवती महिलांना योग्य ते इंजेक्शन आणि औषधं दिली जातात. दरम्यान, एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसऱ्या महिलेवर उपचार सुरु आहेत. पण मृत्यूचं कारण नेमकं काय असू शकतं? याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे…’ त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!