नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या (Tribal society) मानगुटीवरील अंधश्रद्धेचे भूत अजूनही खाली उतरलेले नाही. नाशिकच्या इगतपुरी (Nashik Igatpuri News) तालुक्यातील भोरवाडी पाड्यावरील घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एका महिलेला संपूर्ण गावाने भूताळीन (Superstition) असल्याचं ठरवत तीचं जगणं मुश्किल केलं होतं. गावात घडणाऱ्या प्रत्येक दुर्दैवी घटनेला त्या महिलेला जबाबदार धरलं जात होतं. त्यामुळे गावात अंधश्रद्धेचं भूत किती मोठ्या प्रमाणात पसरलं होतं हे समोर आले होते. यातील काही नागरिकांनी घर सोडून स्थलांतरही केलं होतं. यानंतर अंनिसने यामध्ये हस्तक्षेप करत महिलेला न्याय मिळवून दिला आहे.