AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती दर्शनाला मायलेक गेले, परतताना गुगल मॅपने दिशाभूल केली, महिलेचा मृत्यू

या महामार्गावर पथदिवे, दिशादर्शक फलक तसेच सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. नवख्या व्यक्तीला हा मार्ग तयार झाल्यासारखा दिसत असल्याने आणि अनेकदा ”जीपीएस” हाच मार्ग जवळचा आणि वेगवान मार्ग दाखवत असल्याने अनेक नवख्या वाहनचालकांची दिशाभूल होते.

गणपती दर्शनाला मायलेक गेले, परतताना गुगल मॅपने दिशाभूल केली, महिलेचा मृत्यू
road accident
| Updated on: Jul 03, 2026 | 8:04 PM
Share

गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे एका महिलेच्या दुचाकी वाहनाला अपघात होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बदलापूर जेएनपीटी मार्गावर घडली आहे. ही महिला टिटवाळा येथे गणपती दर्शनाला गेली होती. तेथून कल्याणला परतत असताना जांभळे गावाजवळील नवीन पुलावर त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यात जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.

अरुणा अरुण कुलकर्णी ( वय ५० ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कल्याण एकविरा नगरातील रामदास सोसायटीत राहणाऱ्या अरुणा कुलकर्णी त्यांचा मुलगा प्रतीक कुलकर्णी दुचाकीवरुन २८ जून रोजी टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. गणपती दर्शन झाल्यानंतर रात्री साडे आठच्या सुमारास ते परतत असताना त्यांनी गुगलला जवळचा मार्ग विचारला असता या पुलाचे लोकेशन दाखवण्यात आले.

जांभळे गावाजवळील नदीवरील काम सुरु असलेल्या या पुलावर दुचाकीसमोर खड्डा न दिसल्याने त्याने दुचाकीचा अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे दुचाकीचा तोल गेला आणि मागे बसलेली त्याची आई खाली डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. अरुणा यांना तातडीने बदलापूरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.

गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवला

या प्रकरणात गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात या प्रकरणात अस्कमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जांभळे गावातून जाणारा हा मुंबई- बडोदे महामार्ग असून त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हा मार्ग अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. तरीही हा मार्ग तयार झाल्यासारखा दिसत असल्याने आणि अनेकदा ”जीपीएस” हा मार्ग दाखवतो.या मार्गावरुन वाहन घेतल्याने पुलाच्या जॉईंटवरील खड्ड्यात ही दुचाकी थडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ