काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा रुद्रावतार, जलसंपदा अधिकाऱ्याला इंग्रजीत झापलं!

अमरावती : काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचं रौद्ररुप पाहायला मिळालं. धरणातील पाणी सोडण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्याला इंग्रजीत झापत, शिवीगाळ केली. वर्धा धरणाचे पाणी सोडण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपने हे पाणी रोखल्याचा आरोप त्यांनी केला. यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. काय आहे प्रकरण? तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा …

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा रुद्रावतार, जलसंपदा अधिकाऱ्याला इंग्रजीत झापलं!

अमरावती : काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचं रौद्ररुप पाहायला मिळालं. धरणातील पाणी सोडण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्याला इंग्रजीत झापत, शिवीगाळ केली. वर्धा धरणाचे पाणी सोडण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपने हे पाणी रोखल्याचा आरोप त्यांनी केला. यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

काय आहे प्रकरण?

तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईमुळे अप्पर वर्धा धरणातील पाणी वर्धा नदीपात्रात सोडावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते, मात्र तरीही जलसंपदा विभागाने पाणी रोखल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांचा आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी काल जलसंपदा विभागाच्या बैठकीत संताप व्यक्त केला. या बैठकीचा व्हिडीओ अमरावतीत व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये यशोमती ठाकूर जलसंपदा विभागाचे अधिकारी रवींद्र लांडेकर यांना शिवीगाळ करताना पाहायला मिळतात. त्यासोबतच याच बैठकीत अधिकाऱ्यांकडे कागद भिरकावण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

अमरावती सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर हे भाजपचे आमदार अनिल बोंडेंचे नातेवाईक आहेत. ते पाण्याचे राजकारण करीत असून, त्यांच्या आदेशानेच लांडेकर यांनी पाणी रोखण्याचे महापाप केले, असा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला.

आमदार यशोमती ठाकूर यांचा आरोप

अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यावरुन अमरावती जिल्हात काँग्रेस भाजपात चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात पाणी सोडण्याच्या श्रेयावरुन भाजपाने आडकाठी टाकली असा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला होता. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना श्रेय जाऊ नये म्हणून मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप ठाकूर यांचा आहे. बोंडे यांच्या दबावामुळेच अप्पर वर्धा धरणाचं पाणी सोडण्याला स्थगिती दिली, असा आरोप ठाकूर यांचा आहे. अखेर यशोमती ठाकूर यांच्या आंदोलनानंतर अप्पर वर्धा धरणाचं पाणी आज सोडण्यात आले. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.

 अमरावतीत दुष्काळी स्थिती

अमरावती जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तिवसा तालुक्यात वर्धा नदीवरुन पाणी पुरवठा होत आहे. मात्र वर्धा नदीचे पाणी आटल्याने दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पाण्यासाठी होत असलेली वणवण थांबण्यासाठी जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली होती. रविवारी रात्री 12 वाजता अप्पर वर्धा धरणाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी सोडण्यात येणार होते. तसा आदेश अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढला होता. मात्र अचानक रविवारी अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याच्या काही तासांपूर्वी हा निर्णय प्रशासनाने रद्द केला. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर यांनी पाणी न सोडल्याने सोमवारी सकाळी अप्पर वर्धा धरणात शेकडो कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तासभर काँग्रेसने यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात ठिय्या दिला. तर तेथून सिंचन विभागात बैठक असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या समोर काँग्रेसने गोंधळ घातला. यावेळी काँग्रेसने भाजपावर पक्षपातीपणाचा आरोप केला.

यावेळी यशोमती ठाकूर आणि सिंचन विभागाचे अधिकारी लांडेकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. आमदार यशोमती ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोमवारी सायंकाळी अप्पर वर्धा धरणाचं पाणी सोडण्यात आले.

VIDEO:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *