शिराळ्यात प्रतीमा पूजन करून नागपंचमी साजरी; नागरिकांनी केली होती ही मागणी

या देवस्थानतर्फे सर्प मारू नका तो पर्यावरण व शेतकऱ्यांचा मित्र आहे, असा संदेश दिला जातो. वाघापूर हे गाव नागदैवत जोतिर्लिंग देवस्थानामुळे सर्वत्र नावारूपास आले आहे.

शिराळ्यात प्रतीमा पूजन करून नागपंचमी साजरी; नागरिकांनी केली होती ही मागणी
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 7:51 PM

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील वाघापूरच्या नागदैवत जोतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा उत्साहात साजरी झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले होते. मंदिरात पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा आणि काकड आरती झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सकाळी कुंभारांच्या घरातून मानाची नागमूर्ती मंदिरात आणून तिची विधीवत पूजा केली. भाविकांनी श्रद्धेने नागदैवताला तेल, लाह्या, तांदूळ अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. महिलांनी घरोघरी मातीच्या लहान नागमूर्तीची पूजा केली.

या देवस्थानतर्फे सर्प मारू नका तो पर्यावरण व शेतकऱ्यांचा मित्र आहे, असा संदेश दिला जातो. वाघापूर हे गाव नागदैवत जोतिर्लिंग देवस्थानामुळे सर्वत्र नावारूपास आले आहे. लाखो भाविक नागपंचमी यात्रेनिमित्त दर्शनासाठी आले होते.

भाविकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कूर-वाघापूर मार्ग येण्यासाठी तर वाघापूर-आदमापूरमार्गे मुदाळतिट्टा हा मार्ग जाण्यासाठी वापरला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेत जोतिर्लिंग सहज सेवा ट्रस्टतर्फे अन्नछत्रात शाकाहारी बिर्याणीचा लाभ घेतला. तर, केदार-भैरव मोफत अन्नछत्रातर्फे शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले.

शिराळ्यात साध्या पद्धतीने नागपंचमी

जीवंत नागपुजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा गावात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली. नागपंचमीचा उत्सव बघण्यासाठी अनेक राज्यांतील लाखो भाविक शिराळ्यात दाखल झाले होते. 2002 पासून आम्ही नागाच्या प्रतिमेची पूजा करत आलो आहोत, तरी कोर्टाने आम्हाला जीवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

नांदेडमध्ये ग्रामीण भागात नागपंचमीच्या सणांमुळे महिलांची लगबग दिसून आलीय. पंचमीच्या सणाला वारुळाचे पूजन करत महिलांनी नागदेवतेकडून संरक्षणाची प्रार्थना केली. तसेच या निमित्ताने भुलया खेळत महिलांनी सणाचा आनंद लुटलाय. ग्रामीण भागात आज शेतातील कामे करत नाहीत. त्यातून महिलांना सण साजरा करायला उसंत मिळते.

SAN 1 N

आलापल्लीजवळील नागदेवता मंदिरात भाविकांची गर्दी

नागपंचमी हा सण परंपरेने श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमीला पूर्ण भक्तिभावाने साजरा केला जातो. नागपंचमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा नागांच्या पूजेचा सण आहे. या दिवशी हिंदू धर्मातील लोक पूर्ण विधींनी सापाची पूजा करतात. नागपंचमी निमित्ताने आलापल्लीनजीक असलेल्या नागमंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर आलापल्लीपासून 4 किमीवर निसर्ग रम्य परिसरात नागदेवताचे स्वयंभू मंदिर आहे. या ठिकाणी श्री गणेश आणि विविध देवतांचे मंदिर आहे. नागपंचमी निमित्याने सकाळपासूनच नागमंदिरात दर्शनासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.