यवतमाळ शहरात पुढील तीन दिवस कडकडीत बंद, दूध, पेट्रोल ठराविक वेळेतच मिळणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 24 एप्रिल दुपारी 12 पासून 27 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात (Yavatmal Lockdown Update) येणार आहे

यवतमाळ शहरात पुढील तीन दिवस कडकडीत बंद, दूध, पेट्रोल ठराविक वेळेतच मिळणार
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 11:33 PM

यवतमाळ : राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Yavatmal Lockdown Update) चालला आहे. यवतमाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या 8 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. त्यामुळे यवतमाळ शहर पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिला.

यवतमाळ जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रांपैकी एकाच भागातून पॉझिटिव्ह रुग्ण आढळून (Yavatmal Lockdown Update) येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यवतमाळ शहर 24 एप्रिल दुपारी 12 पासून 27 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे. आज (23 एप्रिल) गुरुवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बंद काळात यवतमाळ शहरातील दवाखाने, औषधी दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने आणि त्यांची औषधांची दुकाने 24 तास सुरू राहतील. तर दुधाची दुकाने सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत सुरु राहतील. तर पशुखाद्याची दुकाने सकाळी 6 ते 9, पेट्रोलपंप सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहणार आहे.

तर अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी 24 तास पेट्रोलपंप सुरू राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाणे व येण्याकरिता मुभा राहील. सदर आदेश फक्त यवतमाळ शहराकरीता लागू राहणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील इतर शहरी ग्रामीण भागाला हे आदेश लागू राहणार नाही. त्या ठिकाणच्या मुभा देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा याआधी ठरवून दिलेल्या वेळेनुसारच सुरू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 च इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आलं (Yavatmal Lockdown Update) आहे.

संबंधित बातम्या : 

स्पेशल रिपोर्ट : सोलापुरात कोरोनाची एन्ट्री नेमकी कशी झाली?

तळीरामांना धीर निघेना, सांगलीत वाईन शॉप फोडून दारुचे बॉक्स लंपास

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.