Yavatmal : यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय

| Updated on: Feb 03, 2022 | 11:17 PM

भांब राजा सर्कलमध्ये सुनील डीवरे यांचा भरपूर दबदबा होता. या घटनेनंतर भांब राजा गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. हत्येच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पवन नामक तरुणाशी डीवरे यांचा व्यावसायिक संघर्षातून वाद झाला होता.

Yavatmal : यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय
यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
Follow us on

यवतमाळ : शिवसेनेचे पदाधिकारी यवतमाळ बाजार समिती संचालक सुनील डीवरे(Sunil Diware) यांची आज त्यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या(Murder) करण्यात आली आहे. डीवरे हे भांब राजा गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच होते. यंदा त्यांची पत्नी अनुप्रिया डीवरे या सरपंच आहेत. सायंकाळी 7.30 च्या सुमारास सुनील डीवरे हे त्यांच्या घरी असताना त्यांच्यावर घरासमोर अचानकपणे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात सुनिल डीवरे यांच्या छातीत आणि पोटात दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. सुनील डीवरे यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार झाल्याचीही माहिती आहे. यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली आणि कुणी केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास करीत आहेत. (Shiv Sena office bearer shot dead in Yavatmal, The incident occurred out of a business dispute)

व्यावसायिक वादातून हत्या झाल्याची शक्यता

भांब राजा सर्कलमध्ये सुनील डीवरे यांचा भरपूर दबदबा होता. या घटनेनंतर भांब राजा गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. हत्येच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पवन नामक तरुणाशी डीवरे यांचा व्यावसायिक संघर्षातून वाद झाला होता. याच वादातून डीवरे यांची हत्या झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते. सुनील डीवरे आणि पवन या दोघांचेही गावाच्या हद्दीत ढाबे आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. रुग्णालयामध्ये नातलग आणि परिचित व्यक्तींनी मोठी गर्दी केली आहे.

नागपूरमध्ये दरोड्याच्या उद्देशाने घरावर फायरिंग

नागपूरमध्ये कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका शेतातील घरावर आठ ते दहा जणांनी अचानक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आरोपींनी यावेळी फायरिंग करत दहशत माजवली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर -जबलपूर हायवेवर यशपाल शर्मा यांचे शेतात घर आहे. त्यांच्या शेतातील घरावर हा हल्ला करण्यात आला. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. मात्र दरोड्याचा प्रयत्न फसल्याने संबंधित आरोपींनी घटनास्थळावरू पळ काढला. (Shiv Sena office bearer shot dead in Yavatmal, The incident occurred out of a business dispute)

इतर बातम्या

एकापेक्षा एक भारीतले ब्रॅन्ड गोव्यातून सोलापुरात आणले खरे! पण दारु रिचवण्याआधीच मोठी कारवाई

Vasai Crime : एकमुखी रुद्राक्ष, राजकीय व आर्थिक प्रगतीचे आमिष; 12 लाखाचा गंडा, वाचा नेमके प्रकरण काय ?