ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय फार…; शिंदेंच्या शिलेदाराने मनातील सल बोलून दाखवली

Uday Samant on Udhav Thackeray and CM Eknath Shinde : मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. 2019 च्या राजकीय घडामोडींचा त्यांनी दाखला दिलाय. वाचा सविस्तर...

ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय फार...; शिंदेंच्या शिलेदाराने मनातील सल बोलून दाखवली
| Edited By: | Updated on: Apr 22, 2024 | 1:54 PM

2019 हे वर्ष महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या महत्वाचं होतं. वेगवेगळी विचारसरणी असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. यावर विविध प्रतिक्रिया आल्या. काहींनी टीका केली तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यवतमाळमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्या 2019 च्या निर्णयावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा तो निर्णय आवडला नसल्याचं उदय सामंत म्हणालेत. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरही त्यांनी टीकास्त्र डागलं आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

34 दिवसांचा मी साक्षीदार होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे वाटत होतं. हा एक धक्का होता. नरेंद्र मोदी साहेबंचा फोटो-भाजप शिवसेना नेत्याचे फोटो टाकून आम्ही निवडणूक लढलो. मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय होता. हा फार वेदनादायी निर्णय होता, असं उदय सामंत म्हणालेत.

अन् तेव्हा उठाव झाला- सामंत

आमदार सहमत का होते की सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होतोय… एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे आम्ही सोबत होतो. त्यानंतर हे लक्षात आले की हे स्वतः साठी होतं… हे शपथविधी नंतर कळालं ही यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. कोरोनासारखं दुर्दैवाने संकट आलं. त्यावेळी आमच्या भावना पुढे आणता आल्या नाहीत. त्यानंतर 2 वर्षांनंतर एकनाथ शिंदेसाहेब बोलले त्यानंतर आम्ही त्यांचं ऐकलं. म्हणून उठाव झाला, असं उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

संजय राऊतांवर टीकास्त्र

वर्षभरापासून सकाळी एक नरेटिव्ह सेट करणं सुरू आहे. एकनाथ शिंदेंवर बोलणं. देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं हे समजू शकतो. पण सभामध्ये जी वक्तव्य केली जात आहेत. जाहीर सभांमध्ये हीन दर्जाचा प्रचार केला जातोय. त्याचा संकल्प 45 पारचा हा पूर्ण होणार नाही. सकाळी उठून निगेटिव्ह तयार करणं आहे. मात्र त्याचा परिणाम होत नाही. अश्या काही बैठका झाल्या होत्या. भविष्यात काही निर्णय घ्यायचे आहेत, मला असं वाटतं. या बैठका कुठ झाल्या? तिथं कोण कोण होत? सकाळी पत्रकार परिषद घेणारे होतं? त्या फार चर्चा आहे त्यावर मला बोलायचं नाही. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. त्यामुळे या लोकांना पोटदुखी होत आहे, असं म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.