AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी योगेश कदमांवर दोन तास ताटकळत बसण्याची वेळ? शिंदेंनी काय दिला सल्ला

सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम चांगलेच अडचणीत आले आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, त्यानंतर आता त्यांनी आपली भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे.

पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी योगेश कदमांवर दोन तास ताटकळत बसण्याची वेळ? शिंदेंनी काय दिला सल्ला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 2:52 PM
Share

गुंड निलेश घायवळ यांचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम आता चांगलेच अडचणीत आले आहेत. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलं आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेली झोड उठवली आहे, पुन्हा एकदा योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, विरोधकांकडून योगेश कदम यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे, त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान त्यानंतर आता योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली भूमिका मांडली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना दिलासा दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांच्या पाठीशी आहेत. चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर द्या,  असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांंना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. योगेश कदम यांनी या प्रकरणानंतर आपली भूमिका एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी देखील माहिती समोर येत आहे, मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना तब्बल दोन तास मुक्तागिरी बंगल्यावर ताटकळत बसून रहावं लागलं, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि कदम यांची भेट झाली.  कदम यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा पक्षातील नेत्यांमध्ये सूर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यात जेवण करता -करता चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिंट चर्चा झाली आहे. जर चुकीचं काही केल नसेल तर घाबरू नका, विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, अशा सूचना यावेळी शिंदे यांनी कदम यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या