सरकारविरोधात घोषणाबाजी, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुंबईत घेतलं ताब्यात, नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन

मुंबईतील दादरमध्ये काँग्रेसने नीट पेपरफुटी विरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनात अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सरकारविरोधात घोषणाबाजी, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुंबईत घेतलं ताब्यात, नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन
mumba youth congress
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 5:33 PM

NEET Paper Leak : राज्यासह संपूर्ण देशात सध्या नीट पेपरफुटीचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. या पेपरफुटीचा केंद्रबिंदू महाराष्ट्र असल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. दरम्यान, आज (2 जून) युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर परिसरात मोठे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाने आक्रमक पवित्रा धारण केल्यानंतर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनात ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.

भाई जगताप, सचिन सावंत आंदोलनात सहभागी

मुंबईतील दादरमध्ये काँग्रेसने नीट पेपरफुटी विरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनात अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेट्सही लावले होते. या आंदोलनात काँग्रेसचे नेते नसीम खान, भाई जगताप सचिन सावंत आदी मोठे नेते उपस्थित होते. अत्यंत आक्रमक पद्धतीने हे आंदोलन केले जात होते.

पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली

मुंबईतील चैत्यभूमी परिसरातून या आंदोलनाला सुरुवात होणार होती. परंतु हा परिसर अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे या भागात आंदोलन करून नये, अशी पोलिसांची भूमिका होती. पोलिसांनी त्या भागात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळील बाजूच्या गल्लीत या आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार होतं. मात्र अगोदरच पोलिसांनी आंदोलकांना रोखलं.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांनी बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणूनच पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी नीट पेपरफुटीचा निषेध केला. तसेच आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेतले. यात काही महिला आंदोलकांचाही समावेश आहे.

भविष्यात असेच आंदोलन सुरू राहणार

दरम्यान, आगामी काळातही आम्ही अशाच प्रकारचे आंदोलन सुरू ठेवू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे आत पेपरफुटी प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us