AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अभिनंदन, नंतर दिला डोस; कर्जमाफी झाली आता या मुद्द्यावर बच्चू कडू आंदोलनाच्या तयारीत

Bachchu Kadu On Loan Waiver : मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.

आधी अभिनंदन, नंतर दिला डोस; कर्जमाफी झाली आता या मुद्द्यावर बच्चू कडू आंदोलनाच्या तयारीत
Bachchu Kadu On Loan WaiverImage Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 5:46 PM
Share

बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. धान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने याबाबतचा शासन निर्णय सध्या जारी होणार नाही, मात्र आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा अध्यादेश सरकारकडून काढला जाणार आहे. या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. आता कर्जमाफीला मंजूरी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना म्हटले की, कर्जमाफीची जी घोषणा झाली आहे, निर्णय झाला आहे त्याचं स्वागत करतो आणि सरकारचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. आंदोलनात सहभागी असलेले राजू शेट्टी, असेल वामनराव चटप, डॉक्टर अजित नवले असतील महादेवराव जानकर असेल रविकांत तुपकर असेल यांचे आभार मानतो. कर्जमाफीची लढाई जिंकली मात्र आता प्रोत्साहन पर एक लाख रुपये करावे यासाठी माझी लढाई सुरू असेल.

शेतकरी कर्जमाफीवरून रघुनाथदादा पाटलांची टीका

शेतकरी कर्जमाफी मंजुरीच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी टीका केली आहे. केवळ मतांसाठी मंजुरी घेतली आहे, 50 हजार अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा सरकारकडून अनेक वर्ष सांगितले जातय, पण ते अजून दिलं गेलं नाही. सरकारकडे शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करतोय, पण कर्जमाफीचा निर्णय घेतला जातोय, सरकारला कर्जमाफी आणि कर्जमुक्ती यातला फरक कळत नाही. सरकारला द्यायचं नाही म्हणून आचारसंहितेची सबब सांगितले जात आहे, केवळ मतांसाठी खोडसाळपणा चालू असून सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप देखील रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.

56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार

सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात, त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाणार आहे. ऐन मान्सूनच्या तोंडावर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Follow Us
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना.
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद..
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा....
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा.
लातूर ते सोलापूर, वादळी वाऱ्यानं सगळं संपवलं, शेतकरी मोठ्या संकटात!
लातूर ते सोलापूर, वादळी वाऱ्यानं सगळं संपवलं, शेतकरी मोठ्या संकटात!.
गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्ट
गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्ट.
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा...
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा....