आधी बसची धडक नंतर पायावरून गेला ट्रक, अखेर ‘तो’ देवदूत होऊन आला अन्…

  • हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 9:36 AM, 27 Jan 2021
आधी बसची धडक नंतर पायावरून गेला ट्रक, अखेर 'तो' देवदूत होऊन आला अन्...

पालघर : अपघातामध्ये देवासारखे धावून येणारे पोलीस, मित्र आणि स्थानिक आपण पाहिलेच आहेत. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. पालघर मनोर रोडवरील नंडोरे इथं पेट्रोल पंपजवळ बाईक आणि बसची भीषण धडक झाली. यामध्ये रक्त बंबाळ झालेल्या तरुणाला वेळीच मदत मिळाल्यामुळे थोडक्यात त्याचा जीव बचावला आहे. जखमी युवकाच्या मदतीला काही तरूण धावून आले आणि त्यामुळे हे शक्य झालं आहे. (Youth help to the injured youth in the accident in palghar)

मिळालेल्या माहितीनुसार, बाईकला बसची धडक लागल्याने बाईकस्वार खाली पडला आणि समोरून येणारी ट्रक युवकाच्या पायावरून गेली. यामुळे युवक काही काळ रक्त बंबाळ अवस्थेत रोडवरच पडला होता. रक्तबंबाळ झालेल्या व्यक्तीला कोणीही उचलत नसल्याचं लक्षात येताच पालघरवरून शिर्डी दर्शनासाठी जाणाऱ्या काही तरुणांनी आपली गाडी थांबवून या ठिकाणी रुग्णवाहिकेला पाचारण केलं आणि जखमी व्यक्तीला उचलून रुग्णवाहिकेतमध्ये टाकून उपचारासाठी पाठवण्यात आलं.

तरुणांनी केलेल्या या कार्याचं पालघरमध्ये कौतूक केलं जातं आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण ऐवढे बुडालो आहे की आपल्याला सामाजिक भान उरलं नाही. पण या तरुणांनी केलेल्या कामाचं खरंच कौतूक करण्यासारखं आहे. प्रत्येकाने एकमेकांच्या मदतीस उभं राहिलं पाहिजे हिच खरी माणूसकी असल्याचं यांनी दाखवून दिलं आहे.

दरम्यान, जमखी तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या प्रकरणात पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. (Youth help to the injured youth in the accident in palghar)

संबंधित बातम्या –

Varun Dhawan Car Accident | लग्नाला जाताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

नंदुरबारमध्ये मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, 5 महिलांचा समावेश

(Youth help to the injured youth in the accident in palghar)