Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या तरुणाने आता थेट..

20 जुलै रोजी सीजेपीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पाहयला मिळालं. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, या आंदोलनात पॅलेट गनचा देखील वापर झाला, आता मोठी बातमी समोर येत आहे.

Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या तरुणाने आता थेट..
abhijeet dipke
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 12:56 PM

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी सीजेपीकडून जंतर -मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं, दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांनी थेट संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तसेच यावेळी पोलिसांनी पॅलेट गनचा देखील वापर केला असाही आरोप होत आहे.

पॅलेट गनचे छर्रे लागून काही आंदोलक गंभीर जखमी झाले होते, अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनानंतर एकदा देखील सीजेपीकडून आम्हाला फोन किंवा मेसेज आलेला नाही. त्यांनी आमच्याशी संर्पक देखील साधण्याचा प्रयत्न केला नाही, अशा शब्दात या जखमी आंदोलकांनी आपली खंत व्यक्त केली आहे.

या घटनेत नजफगडमधील रहिवासी असलेला तरुण साहिल लोचव हा गंभीर जखमी झाला होता, पॅलेट गनचे छर्रे लागल्यामुळे त्याच्या डोळ्याची दृष्टी गेली आहे. दोनदा ऑपरेशन करून देखील अजूनही त्याच्या डोळ्याची दृष्टी परत आलेली नाहीये, पीडित तरुण आणि कुटुंबाने आपली अपबीती सांगितली, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे साहिलची दृष्टी गेली असून, त्याचं कुटुंब सध्या मोठ्या संकटातून जात आहे.

दुसरीकडे बिहारमध्ये राहणारा आणखी एक तरुण प्रशांत हा देखील पॅलेट गनमुळे जखमी झाला होता, तो देखील अजूनही पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाहीये, यावेळी बोलताना त्याने खंत व्यक्त केली आहे. या आंदोलनानंतर मदत तर दूरच पण सीजेपीच्या एका नेत्याकडून देखील आपच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एक साधा फोन देखील आला नसल्याचं प्रशांत यांने म्हटलं आहे. या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, विरोधकांनी देखील हा मुद्दा चांगलाच लावून धरत सरकारची कोंडी केल्याचं पहायला मिळालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us