AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात? AB फॉर्ममधील एका सहीमुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप

झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या सहीमुळे नवा वाद निर्माण झाला असून, सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात? AB फॉर्ममधील एका सहीमुळे राष्ट्रवादीत मोठा भूकंप
Zeeshan Siddique
| Updated on: May 17, 2026 | 11:56 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची काही दिवसांपूर्वी घोषणा केली. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच आता त्यांच्या आमदारकीवर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एबी (AB) फॉर्मवरील सहीमुळे हा नवा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादामागे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले एक पत्र आणि AB फॉर्मवरील माहिती जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला आहे. गेल्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.

सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीच्या या पत्रात पक्षाकडून करण्यात येत असलेला हा पत्रव्यवहार अंतिम समजण्यात यावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या पत्राच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ३० एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांनी एक AB फॉर्म जोडला. त्यावर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी आहे.

निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार जर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्षपदावर अधिकृत नसतील, तर त्यांनी ‘एबी फॉर्म’वर केलेली स्वाक्षरी तांत्रिकदृष्ट्या अवैध ठरू शकते. अशा परिस्थितीत झिशान सिद्दीकी यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार मानण्यात कायदेशीर अडचणी येतील. त्यामुळे पर्यायाने त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता कायदेतज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

कोण आहेत झिशान सिद्दीकी?

झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निवडून येत ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही सांभाळले होते.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, झिशान यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना ४६,३४३ मते मिळाली, परंतु महाविकास आघाडीच्या वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप
मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप.
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार....
आज घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल सेवा विस्कळीत होणार.....
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी
महागाईचा आणखी एक मोठा झटका! गोकुळ दूधही महागलं, तब्बल एवढ्या रुपयांनी.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.