AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकली अन्... रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा

मोठी अपडेट! अजित पवारांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकली अन्… रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा

| Updated on: May 17, 2026 | 10:57 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांदरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्षातील दोन मोठ्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्ज्याच्या भाषेत चर्चा केल्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले की, ही क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही ऐकली आहे. निवडणूक आयोगाला पत्र देण्याआधीच पक्षातील एका नेत्याने ही क्लिप सुनेत्रा पवार यांना ऐकवली होती, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. अजित पवार यांच्यासोबत काम करताना त्यांनी अनेकदा या दोन्ही नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील निधी आणि महत्त्वाचे निर्णय आता सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्या हातात जाणार असल्याच्या चर्चांनाही या वक्तव्यानंतर उधाण आले आहे. हे नेते भाजपसोबत जाणार नसल्याचाही रोहित पवारांनी दावा केलाय.दुसरीकडे राष्ट्रवादीने पक्षातील नेत्यांमध्ये कोणतीच नाराजी नाही असं सागितलं होतं.

Published on: May 17, 2026 10:47 AM
Follow Us