ZP निवडणुकीसाठी मोठा निर्णय, आता शाई लावण्यासाठी मार्कर वापरणार नाही, त्याऐवजी… निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल!
ZP Election : महापालिकांच्या निवडणूकीत काही मतदारांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने ZP निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. काही मतदारांनी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यावर उत्तर दिलं आहे. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून हीच शाई वापरत आहोत. एकदा शाई लावली आणि ती सुकली की ती निघू शकत नाही असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मार्कर वापरला जाणार नाही
मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरलं हे आम्हाला माहिती नाही. समाजात फेक नरेटिव्ह पसरवल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election 2026 : धुळे महानगरपालिकेच्या अवधान गावातील मतदान केंद्रात प्रचंड मोठी गर्दी.
पीयूष पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा आरोप
पराभवाच्या मानसिकतेतून ठाकरे गटाची पत्रकार परिषद, राहुल शेवाळे यांचा आरोप
शाई पुसली जात असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Jalgaon Poll Percentage : जळगाव महानगरपालिकेसाठी दुपारी 1.30 पर्यंत केवळ 22.49% मतदान
Ahilyanagar Poll Percentage : अहिल्यानगरमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 33.91 टक्के मतदान
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम
- 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
- अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल.
- उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
- निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
- मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
- मत मोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 50 टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे. त्यात निवडणूक होणार आहे. एकूण 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीतींसाठी निवडणूक होणार आहे.
कोणत्या विभागातील कोणत्या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक?
- कोकण विभाग – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
- संभाजीनगर विभाग – संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर
