विरार रेल्वेस्टेशनजवळ 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत 7 लाखांच्या नोटा

नालासोपारा : वैतरणा रेल्वे स्थानकात एका 7 वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये 6 लाख 48 हजार 640 रुपये सापडले आहेत. हा अल्पवयीन मुलगा नालासोपारा पूर्वेकडील अन्सारी नगर येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. नेमकं काय घडलं? मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील विरार ते पालघर दरम्यान असणारे वैतरणा रेल्वेस्थानकावर रात्री आठ …

विरार रेल्वेस्टेशनजवळ 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत 7 लाखांच्या नोटा

नालासोपारा : वैतरणा रेल्वे स्थानकात एका 7 वर्षांच्या मुलाच्या बॅगमध्ये 6 लाख 48 हजार 640 रुपये सापडले आहेत. हा अल्पवयीन मुलगा नालासोपारा पूर्वेकडील अन्सारी नगर येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील विरार ते पालघर दरम्यान असणारे वैतरणा रेल्वेस्थानकावर रात्री आठ वाजल्यानंतर फारशी गर्दी नसते. अशा वेळी रात्री पावणे नऊ वाजता 7 वर्षांचा मुलगा पाठीवर बॅग अडकवून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर रेल्वेची वाट पाहत उभा होता. त्याचवेळी वैतरणा येथील तुषार पाटील हे विरारला रात्रपाळी नोकरीसाठी जात होते. त्यांना या मुलाचा संशय आल्याने त्याला आपल्या जवळ घेऊन रेल्वेत सोबत घेतले.

त्या मुलाशी गोड बोलून, त्याची बॅग तपासली असता, त्या बॅगमध्ये चक्क नोटांचे बंडल दिसले. त्यांनी त्याचे नाव विचारले असता नासिर रजाक खान असे आपले नाव सांगून तो नालासोपारा पूर्व अन्सारी नगर येथील राहणारा असल्याचे सांगितले.

वैतरणाच्या तुषार या मुलाने तात्काळ याची माहिती पोलिसांना देऊन मुलाला बॅगसह  वसई लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, हा मुलगा वैतरणा रेल्वेस्थानाकात कसा आला, त्याच्याकडे एवढे पैसे कसे आले, हे पैसे कुणाचे होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *