वसई, विरार, नालासोपाऱ्यात दिवसभरात 51 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, रुग्णांचा आकडा 900 वर

वसई, विरार, नालासोपाऱ्यात काल (4 जून) एकाच दिवसात 51 नवे कोरोना रुग्ण आढळले (Corona Patient increase Virar) आहेत.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात दिवसभरात 51 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, रुग्णांचा आकडा 900 वर

विरार : वसई, विरार, नालासोपाऱ्यात काल (4 जून) एकाच दिवसात 51 नवे कोरोना रुग्ण आढळले (Corona Patient increase Virar) आहेत. त्यामुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 900 वर पोहोचला आहे. सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली (Corona Patient increase Virar) आहे.

वसई, विरार, नालासोपाऱ्यात काल एकूण 2 जणांचा मृत्यू तर 2 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालचे नवे 51 कोरोना रुग्ण पकडून वसई विरार क्षेत्रात आतापर्यंत 929 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे. यातील 31 जणांचा मृत्यू तर 357 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 541 जणांवर उपचार सुरू आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 22 जण हायरिस्कमधील आहेत. त्यानंतर वसई विरार क्षेत्रातील दुकानदार, टेलर, पोलीस, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे. सातत्याने येथील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 933 नवे रुग्ण आढळले आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 77 हजार 793 वर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या :

Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 77 हजार पार, 33,681 रुग्ण बरे, 41,393 बाधितांवर उपचार सुरु

Wardha Corona | अमरावती ते वर्धा दूध टँकरमधून प्रवास, परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *