AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवस्मारक बोट दुर्घटनेनंतरही मुख्यमंत्री ‘त्या’ घोषणेवर ठाम!

मुंबई: शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमात झालेल्या बोट दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या घोषणेवर ठाम आहेत. बोट दुर्घटना हा दुर्दैवी अपघात होता, मात्र त्यामुळे शिवस्मारकाच्या कामात बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर यापुढे पुन्हा शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. भूमीपूजनाला […]

शिवस्मारक बोट दुर्घटनेनंतरही मुख्यमंत्री 'त्या' घोषणेवर ठाम!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM
Share

मुंबई: शिवस्मारक भूमीपूजन कार्यक्रमात झालेल्या बोट दुर्घटनेनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या घोषणेवर ठाम आहेत. बोट दुर्घटना हा दुर्दैवी अपघात होता, मात्र त्यामुळे शिवस्मारकाच्या कामात बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर यापुढे पुन्हा शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.

भूमीपूजनाला मुख्यमंत्री उपस्थित का नव्हते?

मुख्यमंत्री शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित का नव्हते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी तुम्ही कार्यक्रमाला उरकून घ्या, मी कोल्हापुरात असल्याने मला उपस्थित राहणं अवघड आहे, असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी बोट खडकावर आदळल्याने अपघात झाला. बोटचालक शॉर्टकट घेण्याच्या प्रयत्नात होता, त्यामुळे हा अपघात झाला. मात्र या दुर्घटनेनंतर शिवस्मारक प्रकल्पाला कोणतीही बाधा येणार नाही, ते काम नियोजनानुसार सुरु राहील”

इतकंच नाही तर यापुढे या स्मारकासाठी कोणतंही भूमीपूजन होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनीयावेळी जाहीर केलं.

यापूर्वी शिवस्मारकाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी झालं होतं. मात्र तरीही विनायक मेटे यांनी पुन्हा भूमीपूजनाचा घाट घातला होता.

24 ऑक्टोबर रोजी हा भूमीपूजनाचा कार्यक्रम जाहीर नियोजित केला होता. त्यासाठी विनायक मेटे आणि अधिकाऱ्यांसह चार बोट शिवस्मारक स्थळाकडे जात असताना, एका बोटीला अपघात झाला. बोट खडकावर आदळल्याने ती बुडाली. त्यावरील 24 जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र सिद्धेश पवार या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...