दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली

शिवाजी पार्क पोलिसांनी हप्तावसुली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. परंतु, तीन ते चार दिवसांतच हा व्यक्ती जामिनावर बाहेर पडला. | extortion racket in Dadar

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली

मुंबई: दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून सर्रास हप्तावसुली सुरु असल्याप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे ) आक्रमक झाली आहे. हप्तावसुली करणाऱ्या सूत्रधारांना तात्काळ गजाआड करा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली. तसेच याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केलाय. (extortion from street vendors outside Dadar railway station)

काही दिवसांपूर्वीच या घटनेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी हप्तावसुली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. परंतु, तीन ते चार दिवसांतच हा व्यक्ती जामिनावर बाहेर पडला.

आमचा मुद्दा हा आहे की, अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलिसांना काय माहिती मिळाली? तो हप्ते कोणासाठी गोळा करत होता ? काहीतरी सेटिंग असल्याशिवाय फेरीवाले कुणाला हफ्ता देणार नाहीत. महापालिका किंवा पोलिसांशी सेटिंग असल्याशिवाय हे घडणार नाही. हप्ता गोळा केलेला हिस्सा तो कुणाकुणाला द्यायचा हे बाहेर आले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. जे कुणी भ्रष्ट अधिकारी गजाआड जाणे गरजेचे आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

त्यासाठी मी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. ते याप्रकरणी कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. भविष्यात असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याचे पुरावे मनसेकडे पाठवावेत. आम्ही त्याचा पाठपुरावा करु, असेही देशपांडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

शिवडी : शिवसेनेच्या नावाखाली हप्ता वसुली

(extortion from street vendors outside Dadar railway station)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *