Dead-Body On Taxi Roof | रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत

आर्थिक चणचणीत असलेल्या पतीने शेवटी आपल्या पत्नीची तिरडी टॅक्सीच्या रुफला बांधून, स्मशानभूमीपर्यंत नेली.

Dead-Body On Taxi Roof | रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत

मुंबई : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह टॅक्सीच्या टपावर (Dead-Body On Taxi Roof) ठेवून स्मशानभूमीत नेल्याची घटना नालासोपाऱ्यात उघड झाली आहे. टॅक्सीच्या टपावर ठेवून मृतदेह नेतानाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या महामारीत प्रशासनाचा ढिसाळ, मनमानी कारभार आणि रुग्णवाहिका चालकाकडून होत असलेली लूट यामुळे वसई विरार नालासोपाऱ्यात मरणानंतर मृतदेहाची कशी हेळसांड होत आहे, याचे जिवंत चित्रण उघड झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे (Dead-Body On Taxi Roof).

ही घटना शनिवार 20 जूनची आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे राहणाऱ्या हवालदार सिंग यांच्या पत्नीचं रविवारी मध्य रात्री दोनच्या सुमारास निधन झालं. त्यांच्यावर विरारच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांनी सकाळी 11 वाजता मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची तयारी केली.

त्यांचा मुलगा शिवम याने ज्यावेळी मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला, तर तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हता. तसेच, खाजगी रुग्णवाहिका 2000 ते 3000 पर्यंत रक्कम मागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचं घर आणि तुळिंज स्मशानभूमीचं अंतर हे केवळ दोन किमी आहे.

लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद असलेल्या आणि आपल्या पत्नीच्या आजारात पैसे खर्च झालेल्या आर्थिक चणचणीत असलेल्या पतीने शेवटी आपल्या पत्नीची तिरडी टॅक्सीच्या रुफला बांधून, स्मशानभूमीपर्यंत नेली. प्रशानाने अनेक वादे केले असले, तरी मृतदेहालाही जगाचा निरोप घेतल्यावर ही त्याची परवड थांबात नाही, हे या फोटोवरुन समोर आले आहे. सध्या सिंग कुटुंब पत्नीचे कार्यविधी करण्यासाठी आपल्या गावी उत्तर प्रदेशला गेले आहेत (Dead-Body On Taxi Roof).

संबंधित बातम्या :

मिरा रोडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया, मणक्यातून काढला 3.5 सेंमीचा ट्यूमर

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *