AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : मुंबई पूल दुर्घटनेची चौकशी होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील (CSMT) पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. LIVE UPDATE : पालिकेकडून दुर्घटनाग्रस्त पूल तोडण्याचे […]

LIVE : मुंबई पूल दुर्घटनेची चौकशी होणार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील (CSMT) पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

LIVE UPDATE :

  • पालिकेकडून दुर्घटनाग्रस्त पूल तोडण्याचे काम सुरु
  • चौकशी करुन 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश, रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी नमूद करण्याचेही आदेश
  • मुंबईतील पूल दुर्घटनेची चौकशी होणार, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडून चौकशीचे आदेश
  • मुंबईतील पुलांचे जे ऑडिट केले आहेत, तेही पुन्हा तपासले जातील – मुख्यमंत्री
  • संध्याकाळपर्यंत दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी निश्चित करा, मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना आदेश
  • मुंबई : महापालिका आयुक्तांनी सकाळी 10 वाजता अधिकाऱ्यांची बैठक बोलावली
  • मुख्यमंत्री रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतील जखमींना भेटणार
  • मुंबई पूल दुर्घटना : आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
  • मृतांची संख्या 6 वर, जखमींवर उपचार सुरु
  • सकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी भेट देणार, कोसळलेल्या पुलाची पाहणी करणार

मृतांचे नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, शिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचे आदेश दिले. शिवाय पुलाविषयी आयुक्तांकडून माहिती घेतली. या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून मुंबईतील एकूण 445 पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अनेक पूल तोडून नव्याने तयार करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. तर काही पुलांची डागडुजी करण्याचा सल्ला दिला होता. सीएसटीएम स्टेशनजवळ जो पूल कोसळलाय, त्याचंही ऑडिट करण्यात आलं होतं. पण या ऑडिटमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय. या पुलाची निर्मिती 1984 मध्ये करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

IIT मुंबई, बीएमसी आणि रेल्वेकडून सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट

आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे

ऑडिटनंतरही पूल कोसळला, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री

कसाब पुलाने घात केला, चालता चालता पूल कोसळला!

सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल