यंदाची दिवाळी वेगळी, फटाके न फोडता साधेपणाने साजरी करा, मुंबईच्या महापौरांचे आवाहन

रॉकेट किंवा अन्य मोठ्या फटाक्यांवर मात्र बंदी असेल," असे महापौर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar Appeal to do not Bursting Firecrackers)

यंदाची दिवाळी वेगळी, फटाके न फोडता साधेपणाने साजरी करा, मुंबईच्या महापौरांचे आवाहन
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 4:22 PM

मुंबई : “आपण दरवर्षी मोठं-मोठे फटाके फोडतो. मात्र यंदा दिवाळीत फटाके न फोडता ती साधेपणाने साजरी करा,” असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन वगळता मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच मुंबईत फटाके फोडण्यासंबंधी महापालिकेने नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत किशोरी पेडणेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar Appeal to do not Bursting Firecrackers)

“मुंबईत यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशीही केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खाजगी ठिकाणी म्हणजे घरातील अंगण आणि सोसायटी आवारात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडता येणार आहे. यात अनार आणि फुलबाजा हेच फटाके फोडता येतील. रॉकेट किंवा अन्य मोठ्या फटाक्यांवर मात्र बंदी असेल,” असे महापौर म्हणाल्या.

दरम्यान “यंदा फटाके न फोडता सर्वसामान्य नागरिकांनी दिवाळी साजरी करा,” असे आव्हान मुंबईच्या महापौरांनी केलं आहे. “आपण दरवर्षी फटाके फोडतो, पण यंदाची दिवाळी वेगळी आहे, त्यामुळे ती साधेपणाने साजरी करा, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.”

“कोरोनाची परिस्थिती आहे , त्यामुळे सर्वजण सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे यंदाची भाऊबीज ही भावाच्या घरी जाऊन साजरी न करता ऑनलाईन पद्धतीने साजरी करा. मी सुद्धा ऑनलाईन भाऊबीज करणार आहे,” असे किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मार्केटमध्ये मुंबईकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने आज तातडीने दिवाळी निमित्ताने नियमावली जारी करून फटाके फोडण्यास मज्जाव केला आहे. तसेच भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो व्हिडीओ कॉलद्वारे ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी, अशी सूचनाही पालिकेने केली आहे.

हॉटेल, जिमखाना परिसरातही फटाके फोडण्यास बंदी

मुंबईतील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही. तसेच हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत, असंही पालिकेने नमूद केलं आहे.(Mumbai Mayor Kishori Pednekar Appeal to do not Bursting Firecrackers)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी

ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या; मुंबई पालिकेचे भावा-बहिणींना आवाहन

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.