राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत दाखल

शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेले आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांना शिवबंधन बांधलं.

NCP legislator Pandurang Barora to join Shiv Sena today, राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत दाखल

मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेले आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांना शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते. आमदार बरोरा यांनी काल आपला राजीनामा विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आज त्यांनी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शहापूर येथून 100 गाड्यांचा ताफा निघाला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे हजारो कार्येकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा बरोरा यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला शहापूरमध्ये हा खूप मोठा झटका मानला जात आहे.

चुलतभावाचा तीव्र विरोध

दरम्यान, पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी सोडली असली, तरी आगामी निवडणुकीत त्यांना सख्या चुलत भावाचा विरोध असेल. कारण चुलत भाऊ भास्कर बरोरा यांनी पांडुरंग बरोरा यांच्या सेना प्रवेशाला तीव्र विरोध केला आहे. पांडुरंग बरोरा यांना आगामी विधानसभेसाठी शिवसेनेतून उमेदवारी मिळाली, तर राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरोधात भास्कर बरोरा हे आव्हान देऊ शकतात.

शिवसेना कार्यकर्त्यांचाही विरोध

दुसरीकडे पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत प्रवेश करणार असले तरी स्थानिक शिवसैनिकांचा त्यांना विरोध आहे. शहापूरचे शिवसेना तालुकाध्यक्ष मारुती धीर्डे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शहापूरमधील अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दौलत दरोडांची भूमिका

दरम्यान, या मतदारसंघात शिवसेनेकडून माजी आमदार दौलत दरोडा यांनी नेतृत्व केलं होतं. दौलत दरोडा हे इथून तीन वेळा निवडून आले होते. मात्र यंदा त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मारुती धीर्डे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे कट- कारस्थान असल्याचा आरोप, स्थानिक शिवसैनिक करत आहेत.

चंद्रकांत जाधव: कसारा विभाग प्रमुख

शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही 40 वर्षापेक्ष जास्त काळ राबलो. राष्ट्रवादीविरोधात अनेक केसेस आमच्यावर झाल्या. कसारा विभागात तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवली. त्यामुळे पांडुरंग बरोरा यांच्या उमेदवारीला आमचा तीव्रविरोध असून, उमेदवारीसाठी मी स्वतः इच्छुक आहे, असं शिवसेनेचे कसारा विभागप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी सांगितलं.

शिवसेनेत निष्ठावंतांची कमी नाही. जिल्हापरिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, माजी आमदार दौलत दरोडा, माजी सभापती गजानन गोरे, ज्ञानेश्वर तळपदे यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तर चालेल, असं चंद्रकांत जाधव म्हणाले.

कोण आहेत पांडुरंग बरोरा?

  • आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे  आमदार आहेत.
  • बरोरा यांचे 40 वर्षांपासून राष्ट्रवादीशी आणि शरद पवार, अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.
  • पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.

संबंधित बातम्या 

आमदार पांडुरंग बरोरांच्या शिवसेना प्रवेशाला भावाचा विरोध, राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी   

राष्ट्रवादीला धक्का, आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *