शरद पवार माझ्या हृदयात, त्यांना सांगण्याचं धाडस झालं नाही : सचिन अहिर

पवार साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो, पण बोलण्याचं धाडस झालं नाही. वरळी विधानसभेची वस्तूस्थिती, राजकीय स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला”, असं सचिन अहिर म्हणाले. Sharad Pawar in my heart, not dare to tell him about joining shiv sena, said sachin ahir

शरद पवार माझ्या हृदयात, त्यांना सांगण्याचं धाडस झालं नाही : सचिन अहिर
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 4:11 PM

मुंबई :  राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर (Sachin Ahir) शिवबंधन बांधलं. त्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास सचिन अहिर मातोश्रीकडे रवाना झाले. सचिन अहिर घरातून बाहेर पडताना त्यांना मीडियाने गाठलं. त्यावेळी सचिन अहिर यांनी आपलं शिवसेना प्रवेशाचं कारण सांगितलं.

सचिन अहिर म्हणाले, “आदरणीय पवारसाहेबांची (Sharad Pawar)साथ मिळाली. ती न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात. ते योग्य आहेत की नाही हे काळ ठरवतो. आदित्यसारख्या तरुणाशी माझी चर्चा झाली. वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम करण्याचं काम त्याच्या मनात आहे. त्याची जिद्द आहे. अशावेळी राज्यभरातील अशा तरुणांना साथ देणं, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळत आहे. त्यामुळे निर्णय घेतला”

शरद पवार हृदयात

यावेळी सचिन अहिर यांनी शरद पवारांना भेटण्याचा प्रयत्न केल्याचंही नमूद केलं.

“साहेबांना गेल्या आठवड्यात  भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी बोलता आल्या नाहीत. ते माझ्या हृदयात आहेत, ते हृदयाबाहेर जाऊ शकत नाहीत. निर्णय कठीण आहे पण अशक्य  नाही. भागाचा विकास आणि शहराच्या विकासासाठी मी निर्णय घेतोय.  पवार साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो, पण बोलण्याचं धाडस झालं नाही. वरळी विधानसभेची वस्तूस्थिती, राजकीय स्थिती मांडण्याचा प्रयत्न केला”, असं सचिन अहिर म्हणाले.

सचिन अहिर कोण आहेत?

  • सचिन अहिर मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे.
  • 1999 मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार झाले
  • मामा अरुण गवळी यांनी सचिन अहिर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं.
  •  काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या आघाडी सरकारमध्ये  2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी विराजमान झाले.
  • त्यांच्याकडे वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजाचाही अतिरिक्त भार देण्यात आला होता.
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला.
  • शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळी मतदारसंघात अहिर यांचा पराभव केला.
  • यानंतर सचिन अहिर यांना राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
  • अहिर यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघात काम केले आहे.
  • तसेच इंटक कामगार युनियनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

संबंधित बातम्या 

आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?   

राष्ट्रवादीला मोठे खिंडार, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार : सूत्र  

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?  

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.