AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राज्यात 2 तासात 61 हजारवेळा वीज कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Odisha Rain update : पुढचे तीन दिवस हवामान खात्याकडून अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवारी दोन तासात 61 हजारवेळा वीज कोसळली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

या राज्यात 2 तासात 61 हजारवेळा वीज कोसळली, 12 जणांचा मृत्यू
rain updateImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 04, 2023 | 11:43 AM
Share

ओडिसा : ओडिसा (Odisha) राज्यात सध्या सगळीकडं ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस (heavy rain) होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शनिवारी ओडिसा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दोन तासात 61 हजारवेळी वीज कोसळली आहे. त्यामध्ये १२ लोकांचा जीव गेला आहे. त्याचबरोबर १४ लोकं जखमी झाली आहेत. त्यापैकी काही लोकांची हालत एकदम गंभीर आहे. हवामान खात्याकडून (imd) अजून पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पावसाची शक्यता असेल, त्यावेळी तुम्ही जवळच्या सुरक्षित ठिकाणी जावं अशी माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे.

ओडीसा राज्यात येलो अलर्ट जारी

हवामान खात्याने जाहीर केलं आहे की, बंगालच्या उपसागरातही एक चक्रीवादळ तयार झालं आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढच्या तीन तिथल्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सात डिसेंबरपर्यंत ओडीसा राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

लोकांनी सुरक्षित ठिकाणी रहावं

सत्यब्रत साहू यांनी सांगितलं की, राज्यात पुन्हा मान्सून चांगलाचं सक्रीय झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. भुवनेश्वरमध्ये 126 मिमी, कटकमध्ये 95.8 मिमी पाऊस झाला आहे. सत्यब्रत साहू यांनी सांगितलं की, ओडीसा राज्यातील सगळ्या स्थितीवर आमचं लक्ष आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या जिल्ह्यात झालं मोठ नुकसान

वीज कोसळण्याची घटना पाहिली, तर लोकांनी घरातून बाहेर पडू नये, शनिवारी झालेल्या दुर्घटनेत खुर्दा जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. बलांगीर या जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. अंगुल, बौध, ढेंकनाल, गजपति, जगतसिंहपुर या जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्याशिवाय गजपति आणि कंधमाल जिल्ह्यातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?