AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिया शर्मा नावाने कॉल आला, अन त्याचे 2.69 कोटी कधी डुबले कळलेच नाही

फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या साईटवरून फ्रेंड रिक्स्वेट पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. सौर ऊर्जा क्षेत्रातील एका बड्या व्यापाऱ्याला एका तरूणीने समाजमाध्यमावरुन मैत्री करीत लुबाडले.

रिया शर्मा नावाने कॉल आला, अन त्याचे 2.69 कोटी कधी डुबले कळलेच नाही
CYBERImage Credit source: CYBER
| Updated on: Jan 13, 2023 | 11:47 AM
Share

गुजरात:  समाजमाध्यमावर मैत्री करीत तरूणींच्या नावाने व्हीडीओ कॉल करीत फसवणूक करण्याचे प्रकार अलिकडे खूपच वाढले आहेत. आधीही अशा प्रकरणात अनेक बड्या व्यक्ती हनी ट्रॅपमध्ये सापडत आहेत. अशाच एका प्रकरणात एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप सुरू केली आणि त्याचे जगणे अक्षरश: अवघड बनले. तब्बल 2.69 कोटी रूपये त्याच्याकडून लुबाडण्यात आले आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या साईटवरून फ्रेंड रिक्स्वेट पाठवून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. या प्रकरणात रिया शर्मा नावाने फ्रेंड रिक्स्वेट पाठवून गुजरातच्या एका व्यापाऱ्याला चांगलेच गंडवल्याचे उघड झाले आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच मोरबी येथील कथित रिया शर्मा नावाने कॉल करीत एका व्यापाऱ्याशी तिने मैत्री केली. त्यानंतर व्हीडीओ कॉल करीत त्याचे कपडे तिने उतरवायला लावले. त्यानंतर हा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पन्नास हजार मागितले.

हे पैसे व्यापाऱ्याने दिल्यानंतर काही दिवसाने त्याला दिल्ली पोलीसांकडून कॉल आला. इन्सपेक्टर गुड्डू शर्मा नावाने कॉल करीत त्याने ही क्लीप आपल्या ताब्यात असल्याचे सांगत तीन लाख रूपये मागितले. 14 ऑगस्ट रोजी दिल्ली सायबर सेलमधून बोलत असल्याची बतावणी करीत एकाने कॉल केला आणि संबंधित तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून प्रकरण मिटविण्यासाठी 80.97 लाख रूपये व्यापाऱ्याकडे मागण्यात आले. या व्यापाऱ्याने घाबरून ही रक्कमही तातडीने दिली. नंतर सीबीआयमधून एका अधिकाऱ्याचा कॉल आला. या तरूणीच्या आईने सीबीआयला तक्रार केल्याचे सांगत या अधिकाऱ्याने 8.5 लाख रूपये मागितले.

डिसेंबर महीन्यापर्यंत हा व्यापारी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करीत गेला. त्यानंतर ही केस क्लोज झाल्याची ऑर्डर त्याला दाखवण्यात आल्याने त्याला संशय आला. त्याने 10 जानेवारी रोजी सायबर क्राईम ब्रँचकडे त्याने 11 जणांविरूद्ध 2.69 कोटी लुबाडल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कलम 387, 420,  120 बी नूसार गुन्हा दाखल झाला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.