दोन बायका, गोष्ट ऐका… नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, एकमेकींशीच केलं लग्न

देवरियाच्या रुद्रपूर येथील नाथबाबा मंदिरात गुरुवारी एक असं लग्न झालं, ज्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. तेथे दोन विवाहीत महिलांनी एकमेकींशीच लग्न केलं. आजन्म एकत्र राहू, एकमेकींसोबत जगू असं वचनही त्यांनी दिलं.

दोन बायका, गोष्ट ऐका... नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून, एकमेकींशीच केलं लग्न
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 2:47 PM

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील दोन महिलांनी समलैंगिक विवाह केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवरियाच्या नाथबाबा मंदिरात महिलांचं लग्न झालं. आता संपूर्ण जिल्ह्यात याच ग्नाची चर्चा होत आहे. त्यावरून लोकं विविध प्रतिक्रिया देत आहेत. पतीच्या छळाला त्या दोघी एवढ्या कंटाळल्या होत्या की त्यांन घरात राहणं आवडतच नव्हतं.दोन्ही महिलांचे त्यांच्या पतीशी रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण व्हायचं. त्यामुळे त्या अक्षरश: वैतागल्या होत्या. याच दरम्यान, इन्स्टाग्रामवर यांची एकमेकींशी मैत्री झाली. त्या अनेक वर्षे एकमेकांच्या संपर्कात होत्या आणि त्याच काळात दोघीही एकमेकींच्या प्रेमात पडल्या.

अखेर पतीशी रोजच्या होणाऱ्या भांडणामुळे त्या एवढ्या कंटाळल्या की त्यांनी आपापल्या पतीचं घर सोडलं आणि अखेर टोकाचं पाऊल उचललं. त्या घरातून पळाल्या आणि शिव मंदिरात जाऊन त्यांनी एकमेकींशी लग्न केलं.

घरातून पळून जाऊन केलं लग्न

या दोन्ही विवाहित महिलांनी गोरखपूर जिल्ह्यातून देवरिया येथील मंदिरात पळून जाऊन मंदिरात लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार , त्या दोघींचं एकमेकींवर अनेक वर्षांपासून प्रेम होते. त्यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथही घेतली. आम्ही एकमेकींशिवाय जगू; शकत नाही असं म्हणत त्यांनी कायम एकत्र राहण्याचे वचन दिलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  देवरिया भागात ही घटना घडली असून दोन्ही महिला याच परिसरातील रहिवासी आहेत.

सुनावली आपबीती

दोन्ही महिलांच्या सांगण्यानुसार, त्यांचे पती दारू प्यायचे आणि महिलांना मारहाणही करायचे. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्या खूप वैतागल्या होत्या. मात्र दारू पिण्यास विरोध दर्शवल्यास त्यांचे पती त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी द्यायचे. त्यांच्या कॉलनीच्या लोकांसमोरही पती त्यांचा अपमान करायचे. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळूनच त्या महिलांनी एकमेकींशी लग्न केलं. मंदिरात जाऊन त्यांनी सप्तपदी घेत विवाह केला. त्यांच्या या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.