AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 Rupees Note | गुलाबी नोट अजूनही खिशातच! केवळ या 19 शहरांमध्येच बदलण्याची संधी

2000 Rupees Note | देशात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर पडल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 7 ऑक्टोबरपर्यंत या नोटा बदलण्याची संधी दिली होती. तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा अजूनही असतील तर आता या 19 शहरांमध्येच या नोटा बदलण्याची संधी आहे. कोणती आहेत ही 19 शहरे, कुठे बदलता येतील गुलाबी नोटा?

2000 Rupees Note | गुलाबी नोट अजूनही खिशातच! केवळ या 19 शहरांमध्येच बदलण्याची संधी
| Updated on: Oct 10, 2023 | 9:36 AM
Share

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : नोटाबंदीच्या काळात उपलब्ध झालेल्या गुलाबी नोटा आता लोकांच्या कायम आठवणीत राहतील. केंद्र सरकारने या नोटा चलनातून बाहेर केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या 7 ऑक्टोबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची संधी दिली होती. सातत्याने नोटा बदलण्याची डेडलाईन वाढविण्यात आली होती. यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा (2000 Rupees Note) बदलण्याची अंतिम मुदत होती. ही मुदत वाढविण्यात आली. 7 ऑक्टोबरनंतर आता देशातील या 19 शहरांमध्येच नोटा बदलण्याची संधी उपलब्ध आहे. आरबीआयने ही व्यवस्था केली आहे. कोणती आहेत ही 19 शहरे, नागरिकांना कुठे बदलता येतील 2000 रुपयांच्या नोटा?

नोटांना कायद्याचे संरक्षण

केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या असल्या तरी त्या अजूनही कायदेशीर आहेत. या नोटांना कायदेशीर मान्यता आहे. कायद्याचे संरक्षण आहे. याचा सरळ अर्थ कायदेशीररित्या या नोटा अजूनही अवैध झालेल्या नाहीत. त्या वैध आहेत. या नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयात बदलता येतील.

यापूर्वीचे नियम लागू

तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर या शहरात तुम्हाला गुलाबी नोटा बदलता येतील. 19 शहरात आरबीआयने त्यासाठी व्यवस्था केली आहे. नोटा बदलण्यासाठीचे नियम तसेच आहेत. तुम्ही दोन हजार रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलवू शकता. ही शहरं दूर असतील तर पोस्टाने या नोटा तुम्ही आरबीआयच्या विभागीय कार्यालयात तुमच्या बँकेच्या तपशीलासह पाठवू शकता. तुमच्या बँकेच्या खात्यात हा नोटांचे मूल्य जमा होईल.

एका दिवशी इतक्या नोटा बदला

आरबीआयच्या गाईडलाईननुसार, कोणत्याही व्यक्तीला 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलविता येतील. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

या 19 शहरांमध्ये बदलता येतील 2000 च्या नोटा

आरबीआयच्या या 19 शहरांमधील विभागीय कार्यालयात दोन हजारांची नोट बदलता येईल. तुम्ही थेट या कार्यालयात जाऊन नोटा बदलवून घेऊ शकता. नाही तर भारतीय टपाल खात्याकडून या नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता.

  • अहमदाबाद
  • बेंगळुरु
  • बेलापूर
  • भोपाळ
  • भुवनेश्वर
  • चंदीगड
  • चेन्नई
  • गोवाहाटी
  • हैदराबाद
  • जयपूर
  • जम्मू
  • कानपूर
  • कोलकत्ता
  • लखनऊ
  • मुंबई
  • नवी दिल्ली
  • पाटणा
  • तिरुअनंतपूरम
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.