जग हादरलं, 27 बलाढ्य देश अमेरिकेविरोधात आता थेट मैदानात, बोलावली तातडीची बैठक, कोणत्या क्षणी..
अमेरिकेकडून वारंवार ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची धमकी देण्यात येत आहे, त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर आता आपलं लक्ष ग्रीनलँडकडे वळवलं आहे, अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीनलँडवर सत्ता हवी आहे, अमेरिकेला ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा आहे, याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे अमेरिकेच्या या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या आठ देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. येत्या आठ फेब्रुवारीपासून आठ युरोपियन देशांवरील सामानावर अमेरिकेकडून दहा टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. टॅरिफची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, डेन्मार्क, नॉर्वे, स्विडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड, आणि फिनलँड या देशातून अमेरिकेत येणाऱ्या सामानावर येत्या 8 फेब्रुवारीपासून दहा टक्के टॅरिफ लावण्यात येईल, हा टॅरिफ 25 टक्क्यांपर्यंत देखील वाढू शकतो. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत टॅरिफ मागे घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर आता युरोपियन देशातील नेते एकत्र आले आहेत. युरोपियन राष्ट्रांमधील प्रमुख नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या टॅरिफ धोरणाचा जोरदार निषेध करण्यात आला असून, डोनाल्ड ट्रम्प यांचं हे धोरण पूर्णपणे चुकीचं असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी म्हटलं आहे, तर दुसरीकडे फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाचा निषेध केला आहे.
EU ने बोलावली बैठक
अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर ताबा मिळवणं अतिवश्यक असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी आम्ही आमची संपूर्ण ताकद पणाला लावू असा इशाराही ट्रम्प यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता यूरोपीयन संघानं तातडीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीमध्ये युरोपिय संघाचे सदस्य असलेल्या 27 देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत, त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडमधील हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळत आहे.
