300 युनिटपर्यंत मोफत वीज, मोदी सरकारचा निर्णयाचा कसा घेता येणार लाभ

PM Narendra Modi Surya Ghar Yojna | केंद्र सरकारने सुरु केलेल्या 'पीएम सूर्यघर मोफत वीज योजना'तून वीज मिळणार आहे. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशातील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकार 75,021 कोटी रुपये खर्च करणार आहे.

300 युनिटपर्यंत मोफत वीज, मोदी सरकारचा निर्णयाचा कसा घेता येणार लाभ
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 7:50 AM

नवी दिल्ली | दि. 1 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी नागरिकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेत 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. देशातील एक कोटी लोकांना मोफत वीज देण्यासाठी मोदी सरकार 75,021 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

काय आहे योजना

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, छतावर सौरऊर्जा संयंत्रे (रूफ टॉप सोलर) बसवण्याची ही योजना आहे. या योजनेसाठी एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 30,000 रुपये आणि दोन किलोवॅट क्षमतेच्या प्लँटसाठी 60,000 रुपये अनुदान मिळेल. 3 किलोवॅटसाठी 78000 रुपये अनुदान मिळणार आहे. ज्यांनी आपल्या घरावर सौरउर्जा संयंत्रे लावली आहेत, त्यांना प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

कमी व्याजदरात कर्ज

रूफ टॉप सोलर बसवण्यासाठी कमी व्याजात कर्ज मिळणार आहे. रेपो रेटपेक्षा फक्त 0.5 % जास्त व्याज त्यासाठी द्यावा लागणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 500 किलोवॅटसाठी 18000 प्रती किलोवॅट अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती.

असा करा अर्ज

  • योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmsuryaghar.gov.in वर जाऊन अप्लाई फॉर रूफटॉप सोलर पर्याय निवडा.
  • तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीच्या नावाची निवड करा. त्यानंतर आपला ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई मेल टाक
  • नवीन पानावर ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉगीन करा. त्यानंतर समोर फार्म येईल. तो पूर्ण भरा आणि सबिमिट करा.
  • या प्रक्रियेनंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल. त्यानंतर DISCOM मध्ये नोंदणी असलेल्या कोणत्याही वेंडरकरुन प्लॅन्ट इंस्टॉल करता येईल.
  • सोलर पॅनल इंस्टॉलेशन तुम्हाला प्लँट डिटेल देऊन नेट मीटरसाठी अर्ज करावा लागले.
Non Stop LIVE Update
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.