AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानदाराचा अनोखा जुगाड, 2000 च्या नोटवर 50% डिस्काउंटची दिली ऑफर

2000 Rupees Note : एखादे संकट आले म्हणजे त्यातून अनेक जण संधी शोधत असतात. वाराणसीमधील एका दुकानदाराने असाच जुगाड केला आहे. त्याने दोन हजाराची नोट घेऊन येणाऱ्यांसाठी खास ऑफर सुरु केली आहे.

दुकानदाराचा अनोखा जुगाड, 2000 च्या नोटवर 50% डिस्काउंटची दिली ऑफर
2000 note offer
| Updated on: May 28, 2023 | 3:23 PM
Share

वाराणसी : आरबीआयने दोन हजाराची नोट चलनातून हटवली आहे. आपल्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने देशवासियांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन हजाराची नोट पूर्णपणे चलनातून बाहेर काढण्याची आरबीआयने पूर्ण तयारी केली आहे. त्यासंदर्भात सर्व बँकांना गाईडलाईनही जारी केल्या आहेत. त्यानंतर अनेक दुकानदार अन् पेट्रोपंप चालकांकडे दोन हजाराच्या नोटा जास्त येऊ लागल्या आहेत. अनेक ग्राहक 2000 च्या नोटा घेऊन फक्त 100 किंवा 200 खरेदी करतात. यामुळे किरकोळ विक्रीचा मोठा प्रश्न दुकानदारांसमोर उभा राहिला आहे. वाराणसीच्या एका दुकानदाराने ही समस्या सोडवली आहे. अगदी संकट हे संधी समजून ही समस्या सोडवली आहे.

काय केले दुकानदाराने

वाराणसीमधील हा दुकानदार सध्या चर्चेचा विषय बनले आहे. अनेक ठिकाणी दोन हजाराची नोट घेण्यात नाखुशी दाखवत असताना त्याने चक्क ५० टक्के ऑफर सुरु केलीय. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी दोन हजारांच्या नोटांचे चित्र लावले आहे. त्यासोबत ऑफर्स दिली आहे. हा दुकानदार टॅटूचे दुकान चालवतो. त्याने ऑफर देताना म्हटले आहे की, तुम्ही तुमची 2 हजाराची गुलाबी नोट आणा, 2 हजाराची खरेदी करा आणि 50% सूटही मिळवा. अट एवढीच आहे की खरेदी दोन हजार किंवा त्याहून अधिक असावी.

2000 note offer

ग्राहक असा घेताय फायदा दुकानदाराच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना सवलत मिळणार असल्याचे ग्राहक खूश आहे. ऑफर सुरु केल्यापासून दुकानात दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु विक्रीही वाढली आहे. दरम्यान एका ग्राहकाकडे बोट दाखवत दुकानदार म्हणाला, “जसा हा व्यक्ती हातावर चिमणीचे टॅटू काढायला आला होता, पण सवलतीमुळे तो आता गरुडाचा टॅटू काढत आहे.”

दुकानदाराने ही ऑफर लागू केल्यापासून दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. लोक खरेदी करत आहेत आणि आपले टॅटू बनवून घेत आहेत. यामुळे दुकानाचे उत्पन्न तर वाढले आहेच, पण लोकांची 2,000 रुपयांच्या नोटेपासून सुटका होत आहे .

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.