स्वस्त घरे विक्री अभावी पडून, ही आहेत तीन महत्वाची कारणे ?
Affordable House: कोविडच्या आधी एकूण घरांच्या प्रोजेक्टपैकी स्वस्त निवासी घरांच्या प्रकल्पाचा वाटा 40 टक्के होता. आता त्यात घट झाली असून तज्ज्ञांच्या मते आता मोठ्या आकाराच्या 3 बीएचके घरांना मागणी वाढली आहे.
प्रत्येकाला आपले स्वत:चे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. लोकांची आयुष्यभराची पूंजी घर विकत घेताना खर्च होते. एकीकडे परवडणारी घरे जादा बांधली जात असताना देशात आता देशात कोविड – 19 च्या साथीनंतर परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घसरण झाली आहे. या संदर्भात ANAROCK-FICCI ने सर्वेक्षण केलेले आहे. या होमबायर सेंटीमेंट सर्व्हे 2024 च्या मते एकूण 53 टक्के लोक स्वस्त घरांबद्दल नाखूश आहेत. या पाहणीत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घसरण झाल्याची तीन कारणे देण्यात आलेली आहे. काय आहेत ती कारणे पाहूयात…
लोकेशनची समस्या : परवडणारी घरांचे ठिकाण सोयीचे नसल्याने 92 टक्के परवडणाऱ्या घरांचे खरेदीदार नाखुश आहेत.
कंस्ट्रक्शनचा दर्जा : परवडणाऱ्या स्वस्त घरांच्या बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने 84 टक्के लोकांनी घरांच्या दर्जाविषयी नापसंती व्यक्त केली आहे.
घरांचा अपुरा आकार : परवडणारी घरे आकाराने खूपच छोटी आहेत. त्यामुळे वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती असमर्थ आहेत असे 68 टक्के ग्राहकांचे म्हणणे आहे.
परवडणाऱ्या घरांच्या घटत्या मागणीचा सरळ परिणाम नव्या प्रोजेक्टवर होत आहे. आकडेवारी नुसार साल 2024 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत एकूण प्रोजेक्ट्स पैकी केवळ 17 टक्के घरे परवडणाऱ्या कॅटगरीतील होती. तर साल 2021 मध्ये परवडणाऱ्या स्वस्त घरांचा प्रोजेक्टमधील वाटा तब्बल 26 टक्के होता.कोविडच्या आधी स्वस्त निवासी घरांच्या प्रकल्पांचा वाटा 40 टक्क्यांपर्यंत होता. तज्ज्ञांच्या मते आता लोक 3 बीएचके घरांकडे जादा आकर्षित होऊ लागले आहेत.
2 बीएचके घरांची मागणी घटली
ANAROCK-FICCI च्या ( ) होमबायर सेंटीमेंट सर्व्हे 2024 च्या मते 51 टक्के ग्राहकांना मोठ्या आकाराचे फ्लॅट्स पसंद आहेत. तर 2 बीएचके फ्लॅटना केवळ 39 टक्के लोकांनी पसंती दाखवलेली आहे. चेन्नई, दिल्ली-NCR, आणि बंगळुरु येथे मोठ्या फ्लॅटची मागणी जादा आहे. तर मुंबई आणि पुणे येथे अजूनही 2 बीएचके फ्लॅटची मागणी अजूनही कायम आहे. घर खरेदी करणाऱ्यांची प्राथमिकतेच एक आणखी मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता लोक अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये सहज घर बुक करु लागले आहेत.
कशा प्रकारची घरे विकली जात आहेत
सर्वेक्षणामते 2020 मध्ये रेडी – टू – मुव्ह घराच्या तुलनेत नवीन प्रोजेक्ट्सचा रेषीयो 46:18 असा होता. आता तो वाढून 20:25 असा झाला आहे. आता घरे खरेदी करणाऱ्यांचा वेळेवर घरांचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या प्रमुख डेव्हलपर्सवरील वाढलेला विश्वास त्यामुळे हा रेषो वाढलेला आहे. या सर्वेत गुंतवणूकीबाबत ही अनेक रोचक माहीती उघडकीस आली आहे. आता 57 टक्के गुंतवणूकदार भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नावर फोकस करीत आहेत. कारण गेल्या दोन वर्षांत घर भाड्यात 70 टक्के वाढ झालेली आहे. याचा परिणाम होऊन रिअर इस्टेट गुंतवणूक अशा क्षेत्रात गुंतवणूक करीत आहेत जेथे चांगले भाडे मिळत आहे.