AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीर्ण इमारतीमधून येत होता प्रचंड दुर्गंध, समोरच दृश्य पाहून नागरिक हादरले, एकाचवेळी 56 मृतदेह, पोलिसांनाही फुटला घाम

एका जीर्ण इमारतीमधून दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी मोठ्या हिमतीने जाऊन तिथे पहाणी केली, तर त्यांना त्या ठिकाणी एकाचवेळी तब्बल 56 मृतदेह आढळून आले, त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली.

जीर्ण इमारतीमधून येत होता प्रचंड दुर्गंध, समोरच दृश्य पाहून नागरिक हादरले, एकाचवेळी 56 मृतदेह, पोलिसांनाही फुटला घाम
Dilapidated BuildingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 08, 2026 | 9:30 PM
Share

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सुनासान आणि जीर्ण इमारतीमधून तीव्र वास येत होता. हा वास त्या सर्व परिसरात पसरला. नागरिकांना श्वास घेणं देखील कठीण झालं. शेवटी हिंमत करून नागरिकांनी या इमारतीमध्ये नेमकं काय आहे, हे माहिती करून घेण्याचा निर्णय घेतला. नागरिक मोठ्या हिमतीने या बिल्डिगच्या आता पोहोचले, समोरचं दृष्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण या इमारतीमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 56 मृतदेह अस्तव्यस्त पद्धतीने पडले होते, हे पाहून नागरिकांना घाम फुटला, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, समोरचं दृष्ट पाहून पोलिसांनाही जबर धक्का बसला.

ही घटना अमेरिकेतल्या शिकागोमध्ये असलेल्या एका फ्यूनरल होममध्ये घडली आहे. या फ्यूनरल होममध्ये कोणतीही काळजी न घेता, तब्बल 56 मृतदेह तसेच टाकून देण्यात आले होते. हे मृतदेह सडू लागल्यामुळे त्याचा वास त्या संपूर्ण परिसरात पसरला होता. या ठिकाणी नागरिकांना राहणं देखील कठीण झालं होतं. अखेर नागरिकांनी मोठ्या हिंमतीने या फ्यूनरल होमची पहाणी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, समोरचं दृष्ट पाहून पोलिसांनाही धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच कुक काउंटी मेडिकल एग्जामिनर्सचं एक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं.

दरम्यान हे मृतदेह ठेवण्यासाठी रेफिजरेशनचा वापर करण्यात आला नसल्याचं त्यांना आढळून आलं आहे. आता या प्रकरणात चौकशी सुरू असून, या मृतदेहांची ओळख पटवण्यात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली जाणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान हे मृतदेह सडल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात देखील अडचणी निर्माण झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या फ्यूनरल होमचं लायन्सन तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आलं असून, आता या घटनेची चौकशी सुरू आहे.

Follow Us
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
दिवाळीच्या प्रवासाचे नियोजन करताय? रेल्वे तिकीट बुकिंगमध्येच मोठा...
Diwali : दिवाळीत गावी जाण्याचा प्लॅन आहे? अत्ताच करा तयारी, नाही तर...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग