डोक्याजवळ आणखी एक डोकं आलं? हा रोग आहे की आणखी काही? डॉक्टर कसा करणार इलाज?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Feb 06, 2021 | 9:08 AM

असं झालं तर फक्त 10 ते 15 दिवसांतच लड्डससुद्धा सामान्य मुलांप्रमाणे खेळू शकतो आणि आपल्या जीवणाचा आनंद घेऊ शकतो.

डोक्याजवळ आणखी एक डोकं आलं? हा रोग आहे की आणखी काही? डॉक्टर कसा करणार इलाज?

नवी दिल्ली : अनेक वेळा मुलांच्या जन्मताच त्यांने असे आजार होतात की, त्यापुढे विज्ञात थक्क व्हायला होतं. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. लड्डू नावाच्या अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकल्यासह असं काही झालं आहे की, हा विचित्र प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. खरंतर, लड्डूच्या डोक्याच्या मागच्या बाजूला ट्यूमरसारखं काहीतरी आहे, जे अगदी एका दुसर्‍या डोकेसारखं दिसत आहे. म्हणजे लड्डूला पाहिल्यानंतर त्याला दोन डोकी अल्याचं दिसून येतं. खरंतर दोन डोकं असणं हे या चिमुकल्यासाठीही फार कठीण झालं आहे. त्याच्या शरीराच्या हालचालीपासून अने समस्यांचा त्याला सामना करावा लागत आहे. (6 years old disease encephalocele has 2 head know about how his treatment will be done and what is medical challenges)

आज लड्डूवर दिल्लीतल्या एका रूग्णालयामध्ये उपचार करण्यात येत असून ही शस्त्रक्रिया ज्येष्ठ न्यूरो सर्जन डॉक्टर मनीष कुमार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे लड्डूच्या मस्तकाच्या मागे आणखी एक डोकं बाहेर आलं आहे. यावर तातडीने उपचार करावा लागणार असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर फक्त 10 ते 15 दिवसांतच लड्डससुद्धा सामान्य मुलांप्रमाणे खेळू शकतो आणि आपल्या जीवणाचा आनंद घेऊ शकतो. पण ही शस्त्रक्रिया डोक्टरांसमोर मोठं आवाहन आहे. हे ऑपरेशन नेमकं कसं होणार हाच सगळ्यांसमोर प्रश्न आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लड्डूला झालेल्या आजाराचं नाव एनसीएफॅलोसिल असं आहे. या आजारामुळे लड्डूच्या जीवाला धोका आहे, पण दिल्लीचे डॉक्टर मनीष त्यावर योग्य उपचार करतील असंही बोललं जात आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे या दोन डोक्यांमुळे हा चिमुकला झोपूही शकत तो नीट खेळूही शकत नाही.

कशी असेल शस्त्रक्रिया ?

लड्डीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर मनीष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यामध्ये शस्त्रक्रिया अगदी वेगळ्या मार्गाने करावी लागणार आहे. जो वेगळा भाग बाहेर आला आहे त्यामध्ये बाळाचा अर्धा किंवा पर्ण मेंदु असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्जरी करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. इतर ऑपरेशन्सपेक्षा हे वेगळं असणार आहे कारण यामध्ये काहीही झालं तर त्याचा बाळाला भविष्यात मोठा धोका होईल. याने त्याच्या स्मरणशक्तीविषयीही धोका व्यक्त केला जात आहे.

भयंकर म्हणजे अशा प्रकरणामध्ये डोकं फुटण्याचाही धोका असतो. कारण ज्यापद्धतीने त्याची रचना असते ती मर्यादेपेक्षा मोठी असते. यामुळे शरीराला फार मदत होती नागी. डॉक्टर म्हणाले की, ‘अशा परिस्थितीत जितक्या लवकर उपचार होतील तितकं बरं आहे. नाहीतर मोठी अडचण होऊ शकते.’ (6 years old disease encephalocele has 2 head know about how his treatment will be done and what is medical challenges)

संबंधित बातम्या – 

जगातल्या सर्वात मोठ्या हुकूमशहाच्या टॉयलेट सीटचा होणार लिलाव, किंमत वाचून हैराण व्हाल

ऐकावं ते नवलच ! अमेरिकेच्या ह्या सिंगरनं चक्क कपाळावर काही कोटींचा गुलाबी हिराच फिट्ट केला !

VIDEO : कचरा वेचणाऱ्या मावशीने कुत्र्याचा जीव वाचवला, नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

(6 years old disease encephalocele has 2 head know about how his treatment will be done and what is medical challenges)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI