मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

माणसांप्रमाणे इतर सजीवांनाही प्रेम केलं तर त्याबदल्यात तुम्हालाही प्रेम मिळेल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:00 PM, 27 Jan 2021
मगरीशी बोलत पाठीवर फिरवत होता हात, नंतर असं काही झालं की VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल

गुजरात : प्राण्यांनी हल्ला केल्याचे अनेक धक्कादायक व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील. पण आता एक असा व्हीडिओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. माणसांप्रमाणे इतर सजीवांनाही प्रेम केलं तर त्याबदल्यात तुम्हालाही प्रेम मिळेल. मात्र, जर प्रश्न मगरीचा असेल तर… मगर म्हटली की आपल्या सगळ्यांचीच बोलती बंद होते. पण एक व्यक्ती चक्क मगरीशी बोलत असल्याचा हा व्हीडिओ आहे.

सगळ्यात विशेष म्हणजे हा व्यक्ती फक्त मगरीशी बोलतच नाही तर तीच्या पाठीरून हातही फिरवतो. तुम्हाला यावर विश्वास नाही बसणार पण हे खरं आहे. गुजरातचा असा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मगरशी बोलताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे व्हीडिओ मजेदार असतात आणि काहीवेळा ते धक्कादायकही असतात. असाच एक व्हीडिओ गुजरातच्या वडोदरा इथून समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये एक माणूस नदीच्या काठावर मगरीशी बोलत होता. त्याच्या पाठीवर हात फिरवत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीचं नाव पंकड आहे. पंकज भल्या मोठ्या मगरीशी असं काही बोलत होता जसं तो तिला आधीपासूनच ओळखत होता. यावेळी इतर लोक व्यक्तीला मगरीच्या जवळ जाऊ नको असं वारंवार सांगत होते. पण तरीदेखील तो मगरीशी बोलत तिच्या पाठीवर हात फिरवत होता. अखेर मगर शांतपणे तिथून निघून गेली.

संबंधित बातम्या – 

Inspiration | 14व्या वर्षी लग्न तर, 18व्या वर्षी मातृत्व, तरीही जिद्दीने पूर्ण केलं ‘IPS’ बनण्याचं स्वप्न!

दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य

नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट