VIDEO : कचरा वेचणाऱ्या मावशीने कुत्र्याचा जीव वाचवला, नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपती पासून ते कचरा वेचणाऱ्या व्यक्तीपैकी कुणीही माणुसकीचं दर्शन घडवलं तर संपूर्ण समाज त्यापुढे नतमस्तक होतो. अशीच काहीशी घटना समोर आली आहे (woman save dog life video goes to viral).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:25 PM, 27 Jan 2021
VIDEO : कचरा वेचणाऱ्या मावशीने कुत्र्याचा जीव वाचवला, नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई : जगात माणुसकी पेक्षा मोठा धर्म कुठेच नाही. या जगात विकृत, विक्षिप्त लोकं असली तरी या जगात चांगल्या स्वभावाची, निर्मळ मनाची मानसं आजही जिवंत आहेत. माणुसकीचं मोजमापन पैशांमध्ये किंवा धर्मात करता येणार नाही. कारण माणुसकी ही त्याच्या पलिकडे आणि समृद्ध अशी आहे. त्यामुळे मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपती पासून ते कचरा वेचणाऱ्या व्यक्तीपैकी कुणीही माणुसकीचं दर्शन घडवलं तर संपूर्ण समाज त्यापुढे नतमस्तक होतो. अशीच काहीशी घटना समोर आली आहे (woman save dog life video goes to viral).

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कचरा वेचणारी महिला रस्ता क्रॉस करत असताना एका कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. या व्हिडीओला आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओतील कचरा वेचणारी गरीब महिला कचऱ्याचं ओझं खांद्यावर घेऊन रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. मात्र, अचानक एक दुचाकी तिच्यासमोरुन वेगाने येताना दिसते. तिच्या बाजूला एक कुत्रादेखीस रस्ताल क्रॉस करत असतो. कचरा वेचणारी त्या कुत्र्याला मागे खेचून त्याचा जीव वाचवते. त्यानंतर कुत्र्याला घेऊन रस्ता क्रॉस करते.

हा सर्व प्रकार घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. विशेष म्हणजे आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनादेखील हा व्हिडीओ खूप भावला. त्यांनी ट्विटरवर मानवता असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला.

या व्हिडीओला आतापर्यंत 23 हजार पेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तर साडेतीन हजार लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे. याशिवाय 400 लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. त्यामुळे कचरा वेचणाऱ्या महिलेच्या मानुसकीचा संदेश अनेकांपर्यंत पोहोचणार आहे (woman save dog life video goes to viral).

हेही वाचा : जेव्हा महाराष्ट्राच्या प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस एक होतात!