AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

700 दुकाने खाक, 10 कोटींचं नुकसान, इतकी भयंकर आग की जवानांना करावे लागले पाचारण

एका इमारतीमधून आग दुसऱ्या इमारतीमध्ये पोहोचली. बघता बघता आगीने इतकं रौद्र रुप धारण केलं की कोणाला काहीच करता आलं नाही. ज्यामुळे करोडो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

700 दुकाने खाक, 10 कोटींचं नुकसान, इतकी भयंकर आग की जवानांना करावे लागले पाचारण
| Updated on: Apr 01, 2023 | 4:42 PM
Share

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या होजरी-रेडीमेड मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. गेल्या 30 तासांपासून आग धुमसत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी आजुबाजुच्या शहरातून देखील अग्निशमन दलाला बोलवण्यात आले आहे. पाच जिल्ह्यांतून हायड्रोलिक अग्निशमन यंत्रणा मागवण्यात आली आहे. अग्निशमन दलासह लष्करानेही मोर्चा हाती घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने सरकारकडे एनडीआरएफ टीमची मागणी केली. जिल्हा प्रशासन आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांची मदत घेत आहे. आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर या आगीत 700 हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत.

कानपूरचे डीएम विशाख जी अय्यर यांनी सांगितले की, एसडीआरएफची टीम आली आहे. एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. दोन्ही पथके इमारतीच्या आत शोध मोहीम राबवतील. आग विझवण्यासाठी प्रयागराजहून हायड्रोलिक फायर सिस्टीमही मागवण्यात आली आहे. आगीमुळे इमारतीचे नुकसान झाले, तज्ञांना त्याची पाहणी करण्यास सांगितले. कानपूर आयआयटीच्या सिव्हिल इंजिनिअर्सची मदत घेतली जाईल. आयआयटीचे तज्ज्ञ संपूर्ण इमारतीची पाहणी करतील. त्याठिकाणी जो काही अहवाल येईल, त्याच आधारे पुढील कारवाई केली जाईल.

10 कोटींहून अधिकचे नुकसान

बासमंडीमध्ये यूपीमधील सर्वात मोठे रेडीमेड आणि होजरी मार्केट आहे. शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी रात्री उशिरा लागलेली आग शनिवारी सकाळपर्यंत धुमसत होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. एआर टॉवर, हमराज कॉम्प्लेक्ससह जवळपासच्या पाच इमारतींना आग लागली. या आगीत रेडीमेड आणि होजियरीची सुमारे 700 दुकाने जळून खाक झाली. होजरी आणि रेडिमेड व्यापाऱ्यांनी सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आग लागलेल्या पाच इमारतींमध्ये सुमारे 800 रेडीमेड आणि होजियरीची दुकाने आणि गोदामे होती.

एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत पसरली आग

हमराज कॉम्प्लेक्स आणि एआर टॉवरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आग एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यापाऱ्यांनी दुकानांच्या भिंती तोडून दुसऱ्या दुकानात जाण्याचा मार्ग तयार केला होता. त्यामुळे आग आतमध्ये पसरू लागली. एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत आग पसरण्याचे हे मुख्य कारण बनले आहे.

एआर टॉवरच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास टॉवरच्या बाहेर ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा स्फोट झाला. त्याची ठिणगी काही पावलांवर असलेल्या एआर टॉवरच्या पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या कापडी पिशव्यांवर पडली. जोरदार वाऱ्यामुळे ठिणग्यांचे ज्वाळांमध्ये रूपांतर झाले. गुरुवारी उशिरा कापड बाजाराला लागलेली आग शुक्रवारी सकाळपर्यंत आटोक्यात येऊ शकली नाही. सकाळ होताच रस्त्यांवर वाहनांचा लोंढा दिसू लागला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना त्रासाला सामोरे जावे लागले. डीसीपी ट्रॅफिकने एक किलोमीटरच्या परिघात हमराज कॉम्प्लेक्सकडे जाणारे सर्व रस्ते आणि गल्ल्या सील केल्या.

टॉवरमधून तरुणाचा मृतदेह सापडला

बिधानू येथील रहिवासी असलेले ज्ञानचंद्र साहू टॉवरमध्ये काम करणारा भाऊ अजय साहू याच्यासोबत झोपला होता. आग लागल्यानंतर अजय साहू यांनी कसा तरी दुसऱ्या इमारतीवरून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र ग्यानचंद्र साहू आगीत अडकल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचवेळी त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.