वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसच्या उद्घाटनासह ७ अमृत भारत एक्सप्रेसची लाँच डेट जाहीर, तुमच्या शहराचे नाव आहे का पाहा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाची पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेन येत्या १७ जानेवारी रोजी प्रवाशांना लोकार्पण केली जाणार आहे. यावेळी वंदेभारत स्लीपर ट्रेनसह 7 वंदेभारत अमृत भारत एक्सप्रेसची भेट देणार आहेत.

भारताची पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेनची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जानेवारी रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी ७ अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनना देखील सुरुवात होणार आहे. यावेळी रेल्वे शिवाय रस्ते आणि परिवहन संबंधी प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालदा येथे देशांच्या पहिल्या वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही ट्रेन हावडा ते गुवाहाटी ( कामाख्या ) दरम्यान धावणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली या रेल्वेला झेंडा दाखवणार आहे.
वेळची होणार बचत…
संपूर्ण वातानुकूलित असलेली वंदेभारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना विमानासारख्या आलिशान सुविधा असणार आहेत. या ट्रेनमुळे हावडा-गुवाहाटी मार्गावरील प्रवासाची वेळ २.५ तासांची वेळ वाचणार आहे. धार्मिक पर्यटन आणि पर्यटन क्षेत्राला या ट्रेनमुळे मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील चार प्रमुख रेल्वे योजनांचे भूमिपूजन करणार आहेत.
यात बालुरघाट–हिली नवीन रेल्वे मार्ग लाइन, न्यू जलपायगुडीत आधुनिक फ्रेट मेंटेनेन्स सुविधा, सिलीगुडी लोको शेडची उन्नती आणि जलपायगुडी जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनचे मेंटेनेन्स कारखान्याचे आधुनिकीकरण, यांचा समावेश आहे.यामुळे प्रवासी आणि मालवाहतूकीला मजबूती मिळणार आहे. आणि रोजगाराची निर्मिती होणार आहे.
7 नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात
1. न्यू जलपायगुडी–नागरकोईल अमृत भारत एक्सप्रेस
2. न्यू जलपायगुडी–तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस
3. अलीपुरद्वार–एसएमवीटी बंगलुरु अमृत भारत एक्सप्रेस
4. अलीपुरद्वार–मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस
5. कोलकाता (हावडा)–आनंद विहार टर्मिनल
6. कोलकाता (सियालदह)–बनारस
7. कोलकाता (संत्रागाछी)–तांबरम
