AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती नोकरीनिमित्त परदेशात, पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध; महिलेने केले असे काही, ऐकून धक्काच बसेल

अफशाचा दोन वर्षापूर्वी आसिफ नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना एक सहा महिन्यांचा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी आसिफ नोकरीसाठी परदेशात गेला. अफशाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमसंबंधात मुलगा अडथळा ठरत होता.

पती नोकरीनिमित्त परदेशात, पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध; महिलेने केले असे काही, ऐकून धक्काच बसेल
रिकव्हरी एजंटने गर्भवतीला ट्रॅक्टरखाली चिरडले !Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 02, 2022 | 6:56 PM
Share

उत्तर प्रदेश : प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलाची आईनेच हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी आईने अपहरणा (Kidnapping)चा बनाव केला. पोलिसांनी या नराधम मातेला बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे बालकाच्या हत्येचे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले. अफशा असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी आईचे नाव आहे. महिलेचा पती नोकरीनिमित्त परदेशात असतो.

अफशाचा पती नोकरीनिमित्त परदेशी राहतो

अफशाचा दोन वर्षापूर्वी आसिफ नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना एक सहा महिन्यांचा मुलगाही आहे. काही महिन्यांपूर्वी आसिफ नोकरीसाठी परदेशात गेला. अफशाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध सुरु होते. या प्रेमसंबंधात मुलगा अडथळा ठरत होता.

मुलाचा अपहरणाचे नाटक रचले

यानंतर महिलेनेच आपल्या मुलाच्या अपहरणाचे खोटे नाटक रचले. पोलीस आणि परिसरातील नागरिक रात्रभर जंगलात शोध घेत होते. मात्र याच दरम्यान पोलिसांची नजर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर गेली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात करताच अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अल्पवयीन मुलगी घराजवळील रस्त्यालगतच्या नाल्यात निष्पाप मुलाला फेकून देताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी गुरुवारी सकाळी मुलाची आई आफशा हिला अटक केली असता तिने हत्येची कबुली दिली.

प्रेमात अडथळा ठरत असल्याने मुलाची हत्या

प्रेमात अडथळा ठरत असल्याने अल्पवयीन मोलकरणीच्या हातून आपण आपल्या निष्पाप मुलाची हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करत तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तिला कारागृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. (A six month old boy was killed by his mother for having an affair in Uttar Pradesh)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.