असं एक गाव जिथे सर्वच लोकांना आहे एकच किडनी, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
प्रत्येक गाव कोणत्या नं कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध असतं, असचं एक गाव आहे, ज्या गावताील प्रत्येक व्यक्तीला एकच किडनी आहे, त्या मागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

जगाच्या पाठीवर अशी अनेक गाव असतात, जी काही न काही कारणांमुळे जगप्रसिद्ध बनतात. त्यांची प्रसिद्धी एवढी होते, की लोक अशा गावांना भेट देण्यासाठी दूर-दुरून येतात. आज आपण अशाच एका गावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्या गावातील जवळपास सर्वच लोकांना एकच किडनी आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसले, काहींचा यावर विश्वास देखील बसणार नाही, परंतु ही गोष्ट खरी आहे. या गावातील अनेक लोकांना फक्त एकच किडनी आहे. आता तुम्हाला असा प्रश्न देखील पडला असेलच की हे गाव नेमकं कुठे आहे? आणि या गावताील लोकांना जन्मताच एक किडनी असते का? तर असं नाहीये. त्यामागचं कारण देखील धक्कादायक आहे. आज आपण या गावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
हे गाव नेमकं आहे तरी कुठे?
हे गाव नेपाळमध्ये आहे, या गावाला किडनी व्हॅली नावानं देखील ओळखलं जातं. या गावाची सध्या जोरदार चर्चा आहे. या गावाचं वैशिष्ट म्हणजे या गावातील अनेक लोकांकडे एकच किडनी आहे, आणि हे सर्व लोक एकाच किडनीवर आपलं संपूर्ण आयुष्य जगतात. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, काही जणांनी तर या गावाला भेट देखील दिली आहे. मात्र असं नेमकं काय कारण आहे की या लोकांकडे फक्त एकच किडनी आहे? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर कारण ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल.
नेमकं कारण काय?
या गावातील जवळपास सर्वच व्यक्तींना एकच किडनी आहे, त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडतो की या गावातील सर्व लोकांना एकच किडनी का आहे? त्यांना जन्मजात एकच किडनी असावी. परंतु हे प्रकरण तुम्हाला वाटतं तसं नाहीये, तर या गावातील लोकांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. हे लोक आपली एक -एक किडनी विकून त्यातून आलेल्या पैशांमधून आपली उपजीविका करतात. या लोकांकडे रोजगाराचं दुसरं कोणतंही साधन नसल्यामुळे हे लोक किडनी विकून पैसे मिळवतात. त्यामुळे या गावातील अनेक लोकांकडे फक्त एकच किडनी आहे, त्यामुळे या गावाला किडनी व्हॅली असं देखील म्हटलं जातं.
