आक्रीत घडलं, साप चावताच तरुणाची वाचाच गेली, डॉक्टरही हादरले
सापाल सर्वजण घाबरतात. त्याच्या नुसत्या दर्शनाने अंगावर काटा उभा रहातो. सापाच्या विषाने मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडत असतात. परंतू एका गावात एका तरुणासा साप चावल्याने त्याची वाचा गेल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

सापाला सारखा खतरनाक जीव कोणताही नाही. कारण त्याच्या दंशाने माणसाचा थेट जीवच जातो.मात्र, सापाने चावल्याने एका तरुणाची वाचाच बसल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.हा तरुण गावातील नळावर पाणी भरत असताना अचानक सापाने त्याला दंश केला. त्यानंतर या तरुणाचा वाचा गेली असून त्याला बोलताच येत नसल्याने डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले आहे. सापाच्या विषाने व्होकल कॉर्डला प्रभावित केल्याने असे घडल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. ख्वाजा नंगला गावात रोहित नावाच्या तरुणाला नळावर पाणी भरताना अचानक सापाने हाताला चावा घेतला. साप चावताच रोहित जोरात किंचाळला. परंतू त्याचे ओरडण्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द फुटेनात त्याचा आवाज कायमचा गेला. या घटनेने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. साप चावल्याने एखाद्या व्यक्तीचा आवाज जाणे ही घटना दुर्मिळ म्हटली जाते.
रोहितच्या बोटावर सापाने दंश करताना आम्ही पाहिल्याचे रोहितच्या नातेवाईकांनी सांगितले. आधी त्याचा आवाज परत येईल म्हणून त्यांनी वाट पाहिली. परंतू दुसऱ्या दिवशी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एंटी स्नेक वेनम इंजेक्शन दिले आणि त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला मेरठ येथील रुग्णालयात रेफर केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर म्हटली जात आहे. परंतू त्याचा आवाज अजूनही आलेला नाही.
पाणी भरताना साप चावला
जिल्हा रुग्णालयाचे सीएमएस अनुराग वाष्णेय यांनी सांगितले की रुग्णाला सापाने दंश केला होता. आणि त्याचा आवाज निघत नव्हता. एंटी स्नेक वेनम दिल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी मेरठला पाठवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की हा खूपच दुर्मिळ प्रकार आहे. ज्यात विषाने व्होकल कॉर्डला प्रभावित केले आहे.त्यामुळे आवाज गेला आहे.
कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले
कुटुंबियांनी सांगितले की आम्हाला आशा आहे की रोहित आवाज पुन्हा परत येईल. सध्या ही घटना गावात चर्चेचा विषय बनली आहे. लोक या प्रकारला रहस्यमयी मानत आहेत.
