AAP ला धक्का, आमदार सोमनाथ भारतींना 2 वर्षांचा तुरुंगवास, कारण काय?

माजी कायदा मंत्री आणि आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने त्यांची 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवलीय.

AAP ला धक्का, आमदार सोमनाथ भारतींना 2 वर्षांचा तुरुंगवास, कारण काय?


नवी दिल्ली : माजी कायदा मंत्री आणि आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्या अडचणीत वाढ झालीय. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने त्यांची 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवलीय. दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसानीसह त्यांच्यावर गंभीर आरोप होते. या प्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलंय (AAP MLA Somnath Bharati challenge 2 year prison in AIIMS assault case).

सोमनाथ भारती यांनी 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आपल्याला खोट्या प्रकरणात फसवल्याचा दावा करत ही शिक्षा रद्द करण्याची मागणी केलीय. याआधी त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला एव्हेन्यू कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र, या प्रकरणी न्यायालयाने निकाल सुनावत 23 मार्च रोजी शिक्षा कायम ठेवली. आता त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

दरम्यान, याआधी सोमनाथ भारती यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी थेट तिहार जेलमध्ये झाली होती. राऊज एव्हेन्यू कोर्टाने सोमनाथ भारती यांना 2 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

भारतींची आमदारकी जाणार?

आता उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवल्यास सोमनाथ भारती यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. जर उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली तर त्यांची आमदारकीही जाऊ शकते. तसेच पुढील 6 वर्षे त्यांना निवडणूक लढण्यासही बंदी घातली जाऊ शकते.

सेशन कोर्टातही निकालाला आव्हान

मंगळवारी (23 मार्च) दिल्लीच्या राउज एवेन्यू कोर्टाने AAP आमदाराला तुरुंगात पाठवलं होतं. सोमनाथ भारती यांच्यावर 2016 मध्ये एम्स रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 23 जानेवारी रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

सोमनाथ भारतींवर काय आरोप?

सोमनाथ भारतींवर दंगल करणे, बेकायदेशीरपणे लोकांना जमवणे आणि प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे असे गंभीर आरोप आहेत. या आरोपांमध्ये कनिष्ठ न्यायालयाने भारती यांना दोषी ठरवलं आहे.

हेही वाचा :

‘आप’च्या दिल्लीत भाजपची लाट ओसरली; महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपची पाटी कोरी

गुजरातमध्ये काँग्रेसला अक्षरश: गाडलं, आप, एमआयएमची टक्कर, वाचा अंतिम निकाल सविस्तर

गुजरात निवडणुकीत आप आणि एमआयएमला लॉटरी, काँग्रेसचा पाय खोलात; भाजपने गड राखले

व्हिडीओ पाहा :

AAP MLA Somnath Bharati challenge 2 year prison in AIIMS assault case