अभी भी टाइम है… समझ जाओ… बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ व्हिडीओ का होतोय गुजरातमध्ये व्हायरल?

| Updated on: Dec 01, 2022 | 10:29 AM

मला जामनगरच्या लोकांवर विश्वास आहे. मला जामनगरने अनेक गोष्टी दिल्या आहेत. एक म्हणजे माझ्या नवऱ्याचा जन्म जामनगरला झाला. त्यांचं करियर जामनगरमधूनच झालं.

अभी भी टाइम है… समझ जाओ... बाळासाहेब ठाकरे यांचा तो व्हिडीओ का होतोय गुजरातमध्ये व्हायरल?
अभी भी टाइम है… समझ जाओ... बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ का होतोय गुजरातमध्ये व्हायरल?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांपैकी 89 जागांवर आज पहिल्या टप्प्यात मतदान सुरू झालं आहे. या मतदानाच्या काही तासापूर्वीच प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल केला आहे. तसेच पोस्टवर नरेंद्र मोदी नसतील तर गुजरातही हातचे जाईल, अशी कमेंट केली आहे. अभी भी समय है, समझ जाओ गुजरातियों, असं कमेंट करत जडेजाने बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडीओ जुना आहे. त्या बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी यांचं गुणगान गाताना दिसत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे. नरेंद्र मोदी नाहीत तर गुजरात काहीच नाही, असं बाळासाहेब या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आज मतदान असल्याने हा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल होत आहे.

जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजूला केलं तर गुजरात गेला. हे माझं वाक्य आहे. हे माझं वाक्य मी आडवाणींपाशी बोललो आहे, असंही बाळासाहेब या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

अवघ्या 19 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. तीन तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला 4.9 लाख व्ह्यूज आहेत. 43.4 हजार लाईक्स आहेत. तर 1.4 हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या असून मोठ्या प्रमाणावर हे ट्विट शेअर केलं आहे.

जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा उत्तर जामनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 2019मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना तिकीट दिलं आहे.

2017मध्ये भाजपचे नेते धर्मेंद्रसिंह जडेजा हे उत्तर जामनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी भाजपने धर्मेंदसिंह यांचा पत्ता कापला असून रवींद्र जडेजाच्या पत्नीला तिकीट दिलं आहे.

रीवाबा भाजपमधून लढत असली तरी तिच्या सासऱ्याने आणि नणदेने काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. रवींद्र जडेजाची भावजय नयनाबा जडेजा या काँग्रेसमध्ये आहेत. निवडणुकीवेळी रीवाबाने कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं म्हटलं होतं.

कुटुंबात राजकारणावरून कोणतीही कटुता नाही. ही विचारधारेची लढाई आहे. तसेच एकाच कुटुंबातील दोन सदस्य वेगवेगळ्या पक्षात काम करत आहेत ही देशातील पहिली गोष्ट नाहीये, असंही तिने म्हटलं होतं.

मला जामनगरच्या लोकांवर विश्वास आहे. मला जामनगरने अनेक गोष्टी दिल्या आहेत. एक म्हणजे माझ्या नवऱ्याचा जन्म जामनगरला झाला. त्यांचं करियर जामनगरमधूनच झालं, असंही तिने सांगितलं. रवींद्र जडेजाने रीवाबासाठी प्रचार केला.

यावेळी त्याने मोदींची भेट घेतली होती. आता रवींद्र जडेजा यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांचा व्हीडीओ शेअर करून एक प्रकारे रीवाबाला निवडून देण्याचं आवाहनच केल्याचं सांगितलं जात आहे.