आता चावायचंच, सोडायचं नाही… ‘कॉकरो’च लालबुंद… दीपकेंना अटक होताच मोठी घोषणा; दिल्लीत मोठं काही घडणार?

अभिजीत दीपके यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच अटक केली आहे. या कारवाईने कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी "चावायचंच, सोडायचं नाही" असा निर्धार केला आहे. अटकेनंतरही सीजेपीने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आता चावायचंच, सोडायचं नाही... कॉकरोच लालबुंद... दीपकेंना अटक होताच मोठी घोषणा; दिल्लीत मोठं काही घडणार?
Abhijit Deepke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 12:02 PM

हिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी सौरव दास तसेच आशुतोष रांका यांना पोलिसांनी विमानातच घुसून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या तिघांना विमानातून उतरण्याची संधीही दिली नाही. विमान लँड होताच लगेच पोलीस विमानात घुसले आणि त्यांनी या तिघांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या मुजोर कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईने कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड लालबुंद झाले आहेत. संघटनेच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली असली तरी कार्यकर्त्यांनी आता चावायचंच, सोडायचं नाही, असा निर्धारच जणू केला आहे. सीजेपी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नेत्यांना अटक केली असली तरी दिल्लीतील हवा तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

आज जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रंका यांना विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आधी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सामाजिक कार्यकर्ते ध्रुव राठी यांनाही गुरुग्राममधील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. सीजेपीच्या कायदेविषयक विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह आणि पक्षनेत्या मेहर यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. त्यामुळे सीजेपी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

Loading...

तुम्हीच नेते व्हा, नेतृत्व करा…

पोलिसांनी सीजेपीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, तरीही सीजेपी कार्यकर्ते खचून गेले नाहीत. या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली आहे. सीजेपीने देशभरातील आंदोलनकर्त्यांना पुढे येऊन आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे. तुम्हीच नेते व्हा, तुम्हीच नेतृत्व करा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी यावेळी सीजेपीने केली आहे. नेत्यांना ताब्यात घेतलं तरी देशव्यापी आंदोलन सुरूच ठेवायचं आहे. त्यात तसूभरीह तडजोड करायची नाही, असं सीजेपीने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

जंतरमंतरवर पोहोचणे कठिण

दरम्यान, पोलिसांनी कालपासूनच जंतरमंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. जंतरमंतर, संसद परिसर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या परिसरात जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या परिसरात फिरकणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे जंतरमंतरवर अजून आंदोलक पोहोचलेले दिसत नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us