हात जोडले… मेसेज केला… अभिजीत दीपके पोलिसांसमोर कळवले, विमानातच हायव्होल्टेज ड्रामा; Video व्हायरल
दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातून जंतरमंतर आंदोलनाला जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले. विमानात हायव्होल्टेज ड्रामा घडला. दीपके यांनी विनवणी केली, पण पोलिसांनी ऐकले नाही. ही पूर्वनियोजित कारवाई होती, ज्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातच ताब्यात घेतलं. या तिन्ही नेत्यांनी जंतरमंतरवर आंदोलनाला जाऊ नये म्हणून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिजीत दीपके विमानात पोलिसांना हात जोडत होते. माझी बॅग मला घेऊ द्या. मी अटक व्हायलाच आलो आहे, असं अभिजीत दीपके कळवळून सांगत होते. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. पोलिसांनी दीपकेंना साधी बॅग घेण्याचीही संधीच दिली नाही, थेट ताब्यात घेतलं. त्यामुळे पोलीस आणि दीपके यांच्या वादावादी झाली. सीजेपीचे कार्यकर्ते भडकले. विमानातच हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला.
काय घडलं विमानात?
दिल्ली विमानतळावर विमान लँड होताच पोलिस विमानात घुसले. त्यांनी आधी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर दीपकेंच्या दिशेने मोर्चा वळवला. अभिजीत आपल्या जागेवरून उठले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या दंडाला पकडून तुम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचं सांगितलं. त्यावर दीपके यांनी खिशातून मोबाईल काढून कुणाला तरी मेसेज केला. त्यानंतर, अरे मला माझी बॅग तर घेऊ द्या. मी अटक व्हायलाच आलो आहे. मला करा अटक. मी अटक व्हायलाच आलो आहे. तुम्हाला मी घाबरलो नाही, असं सांगत पोलिसांना हात जोडले. मला माझी बॅग घेऊ द्या असं ते कळवळून पोलिसांना सांगत होते. पण पोलीस ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे दीपके आणि त्यांचे सहकारी पोलिसांवर भडकले. पोलिसांनीही मुजोरी आणि अरेरावी सुरूच ठेवल्याने विमानातच वादावादी झाली. त्यामुळे हायव्होल्टेज ड्रामा रंगला.
पोलिसांचा बिग प्लान
पोलिसांनी अभिजीत दीपकेंना ताब्यात घेण्यासाठी आधीच प्लान केला होता. पोलिसांना दाखवण्यासाठी विमानतळाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे दीपके विमानतळाच्या बाहेर आल्यावर त्यांना ताब्यात घेतलं जाईल असा कयास होता. पण काही पोलीस विमानतळावर साध्या वेशात गेले होते. दीपके यांचं विमान येताच पोलीस विमानात घुसले. विमानातील प्रवाशांना विमानातून न उतरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रवाशी जागेवरच बसून होते. त्यानंतर त्यांनी दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हा प्रीप्लानच केला होता.
कुठे नेणार? माहीत नाही?
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दीपके आणि त्यांच्य सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, त्यांना अजून विमानतळाच्या बाहेर आणलं नाही. दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात येणार आहे. पण कोणत्या पोलीस ठाण्यात नेणार हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे दीपकेंना पोलीस ठाण्यात नेणार की परतीच्या विमानाने परत मुंबईला पाठवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.