AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : भाजपात या नाहीतर…अभिजीत दीपकेंना मिळाली होती धमकी, आई-वडिलांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

नीट गैरव्यविरोधात यशस्वी आंदोलन करणारे अभिजीत दीपके घरी परतल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. अभिजीतवर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव आणला जात होता, नाहीतर कुटुंबाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आली होती. या भीतीने दीपके कुटुंबाला १६ दिवस घर सोडून नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागला.

Abhijeet Dipke : भाजपात या नाहीतर...अभिजीत दीपकेंना मिळाली होती धमकी, आई-वडिलांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ
CJP संस्थापक अभिजीत दीपके
| Updated on: Jul 30, 2026 | 8:30 AM
Share

नीटमधील गैरव्यवहारावरून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कर आंदोलन करून अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या आंदोलनकर्त्यांसह जंतरमंतरव ठिय्या देणाऱ्या एका चेहऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ते नाव म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांचं. दीड महिन्याच्या यशस्वी आंदोलनानंतर आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मिळवून राहिल्यानंतर काल अभिजीत दीपके याचं बऱ्याच काळाने त्याच्या घरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन झालं. मोठ्या काळाने आपल्या लेकाला पाहून आई-वडील आनंदी तर होतेच पण भावूकही झाले होते. त्यांनी लेकाचं साश्रूनयनांनी स्वागत केलं. मात्र, याच दरम्यान त्याच्या आई-वडिलांनी मोठा, धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत.

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. तसेच त्यांनी भाजपमध्येप्रवेश न केल्यास कुटुंबाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आली होती, असा दाव त्यांच्या आई-वडिलांनी केला आहे. या कथित धमकीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या दीपके कुटुंबाला काही काळासाठी घर सोडून नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागला होता, असंही त्यांनी नमूद केलं. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली होती.

अभिजीतला मिळाली होती धमकी

अभिजित दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केल्यानंतर काही दिवसांनी अभिजितने कुटुंबीयांना एका धमकीच्या व्हिडिओबाबत सांगितलं. त्या व्हिडिओमध्ये त्याला, भाजपमध्ये सामील होण्यास सांगण्यात आलं होतं. आणि तसं केलं नाही तर, आई-वडिलांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही देण्यात आला होता, असा दावा अभिजीतच्या आईने अनिता यांनी केला.

सुरुवातीला अभिजितने ही बाब कुटुंबापासून लपवून ठेवली होती. मात्र नंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला आणि तो व्हिडिओ पाहू नका, असा सल्लाही दिला. तसेच काही दिवसांसाठी घरापासून दूर राहण्याची विनंती त्याने आम्हाला केली, असंही अनिता दीपके यांनी नमूद केलं.

16 दिवस नातेवाईकांकडे वास्तव्य

मी अशा धमक्यांना घाबरत नाही, असं अभिजीतने सांगितलं होतं. पण आम्हाला ( त्याचे आई-वडील) अशा परिस्थितीचा अनुभव नसल्यामुळे, त्याला आमच्या सुरक्षिततेची चिंता होती, असं अनिता म्हणाल्या. त्यानंतर त्या आणि त्यांचे पती भगवान दीपके यांनी कोकणातील एका नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला. ते सुमारे 16 दिवस तिथेच वास्तव्यास होते. त्या काळात अभिजित घरापासून दूर होता. शिवाय, भगवान दीपके यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीचीही अभिजितला चिंता होती, असं अनिता यांनी सांगितलं.

सार्वजनिक जीवनात टीका अपरिहार्य

यावर अभिजीतचे वडील भगवान दीपके यांनीही मत मांडलं. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींवर टीका होणे ही स्वाभाविक बाब आहे. काही लोक एखाद्याच्या कार्यावर टीका करतात, तर काही त्याचे कौतुक करतात. काही जण पूर्वग्रहातून घटनांकडे पाहतात, तर काही संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्यानंतरच मत व्यक्त करतात, असं ते म्हणाले.

यावेळी बोलताना, अनिता दीपके यांनी अभिजितच्या बालपणातील एक आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या की, लहानपणी अभिजित इतर कुणापेक्षा आपल्या वडिलांनाच जास्त घाबरायचा. एकदा घरातील दुरुस्तीसाठी त्याने प्लंबरला बोलावले होते. मात्र, पाइपमध्ये बिघाड झाल्याने घरात पाणी साचले. वडील रागावतील या भीतीने अभिजितने काही कपडे घेतले आणि नियोजित वेळेच्या आधीच शांतपणे घर सोडले. नंतर दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण झाले. मात्र, ही घटना त्यांनी जवळपास सहा महिने आपल्या पतीपासून लपवून ठेवली होती, असे अनिता दीपके यांनी हसत सांगितले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा