भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेलाला टॉप दहशतवादी अबू जुंदाल कोण? कंदहार विमानाचा मास्टर माइंडचाही खात्मा

Top terrorists killed list in operation sindoor: 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सर्व दहा दहशतवाद्यांना अबू जुंदाल याने प्रशिक्षण दिले होते. सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजा किंवा अबू जुंदाल हा इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी आहे.

भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेलाला टॉप दहशतवादी अबू जुंदाल कोण? कंदहार विमानाचा मास्टर माइंडचाही खात्मा
टॉप दहशतवादी अबू जुंदाल कोण?
| Updated on: May 10, 2025 | 2:29 PM

Top terrorists killed in operation sindoor: भारताने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले गेल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील 10 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचे चार जवळचे सहकारी ठार झाले आहेत. आता भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या टॉप दहशतवाद्यांची यादी आली आहे. त्यात 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सर्व दहा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा अबू जुंदाल आणि कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड मोहम्मद अझहर याचाही समावेश आहे. पाकिस्तानी लष्कराने अबू जुंदाल याला गार्ड ऑफ ऑनर दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

कोण आहे अबू जुंदाल

26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सर्व दहा दहशतवाद्यांना अबू जुंदाल याने प्रशिक्षण दिले होते. सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजा किंवा अबू जुंदाल हा इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी आहे. 21 मे 2011 रोजी भारताने जाहीर केलेल्या पाकिस्तानात असलेल्या 50 मोस्ट वॉन्टेड अबू जुंदाल याचे नाव होते. या अबू जुंदाल याला पाकिस्तान लष्कराने गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे.

कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड मोहम्मद अझहर

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी मोहम्मद अझहर भारताच्या हल्ल्यात ठार झाला आहे. तो मौलाना मसूद अझहरचा मेहुणाही होता. 1999 मध्ये झालेल्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातील तो मास्टर माइंड होता. त्यानेच मसूद अझहर याची सुटका विमान अपहरणाच्या बदल्यात करुन घेतली होती. तो जेएमसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचा मुख्य प्रशिक्षक होता. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता.

भारताचा एअर स्ट्राईकमध्ये हाफिज मुहम्मद जमील, खालिद @ अबू आकाश आणि मोहम्मद हसन खान या टॉप दहशतवाद्यांचाही खात्मा झाला आहे. यामुळे भारताचे ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पनाही करणार नाही, अशी शिक्षा दहशतवाद्यांना दिली जाईल, असे म्हटले होते. त्या पद्धतीने दहशतवादी तळ आणि दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.